Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशतंदूर रोटी ताटातून गायब होणार? सरकारने घातली बंदी; उल्लंघन केल्यास ५ लाखांचा...

तंदूर रोटी ताटातून गायब होणार? सरकारने घातली बंदी; उल्लंघन केल्यास ५ लाखांचा दंड, जाणून घ्या कारण

खवैय्यांची सातत्यानं पसंती असणारा आणि अनेकांच्याच पानात सर्रास दिसणारा एक पदार्थ म्हणजे तंदूर रोटी (Tandoor Toti recipe). हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरायला गेलं असतासुद्धा (Butter Chicken) बटर चिकन असो किंवा…

मग (Paneer butter Masala) पनीर बटर मसाला असो त्यासोबत तंदूर रोटी दिसतेच दिसते. पण, आता मात्र चवीनं खाणाऱ्यांची अडचण वाढणार आहे. कारण, त्यांना आता या तंदूर रोटीसाठी पर्याय शोधावा लागणार आहे. कारण, या रोटीवर बंदी आणण्यात आली आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशच्या भोपाळ, इंदूर, जबलपूर आणि ग्वाल्हेरमध्ये तंदुरी रोटी मिळणार नाही. वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तंदूर रोटीवर बंदी घातली आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास ५ लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण वेगाने पसरत आहे. हे थांबवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे.

Shraddha Murder Case : “केस अन् चेहऱ्यासाठी ब्लो टॉर्च वापरला तर, हाडे…”; श्रद्धा हत्याकांडाबाबत आफताबचा धक्कादायक खुलासा

वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठे पाऊल उचलत तंदुरी रोटीवर बंदी घातली आहे. तंदुरी रोटी बनवण्यासाठी लाकूड व कोळशाचा वापर होतो, ज्यामुळे वायू प्रदूषण वाढण्याचा धोका आहे. म्हणूनच मध्य प्रदेशच्या अन्न विभागाने तंदूर रोटीवरील बंदीचा हा आदेश जारी केला आहे. राज्यातील हॉटेल-ढाबा चालकांना अन्न विभागाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. अन्न विभागाने या आदेशात वाढत्या प्रदूषणाचा हवाला दिला आहे.

राहुरी, श्रीरामपूरच्या आकाशातून रात्रीच्या अंधारात नेमकं काय गेलं?…. नागरिकांनी अनुभवले अनोखे दृष्य

सरकारने हॉटेल मालकांना तीन दिवसांची मुदत दिली आहे. इलेक्ट्रिक ओव्हन किंवा एलपीजी वापरल्यास तंदुरी रोटी महाग होईल, असे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. तंदूर बंद करण्यासाठी प्रशासनाने अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रदूषण नियंत्रण पथके तैनात केली आहेत.

प्रदूषण रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले असले तरी त्यावरून आता हॉटेल चालक-मालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. प्रदूषणाला रोखण्यासाठी इतरदेखील काही पर्याय असू शकतात, असा सूरही उमटत आहे.

आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक; म्हणाले, “…याचे परिणाम भोगावे लागतील”

- Advertisment -

ताज्या बातम्या