Friday, May 3, 2024
Homeनगरचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर दरीत कोसळला

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर दरीत कोसळला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

तालुक्यातील माणिकदौंडी घाटात (Manikdaundi Ghat) एका धोकादायक वळणावर दहा चाकी टँकरचा अपघात (Tanker Accident) होऊन टँकर दरीत जाऊन कोसळून (The Tanker Crashed into a Ravine) यात गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान (Loss) झाले आहे. हा अपघात (Accident) शनिवारी पहाटे झाला असून यात कोणतेही मोठी जीवित हानी झाली नाही. माणिकदौंडीकडून (Manikdaundi) हा टँकर पाथर्डीच्या (Pathardi) दिशेनं जात असताना घाटात धोकादायक वळणावर टँकरवरचा चालकाचा (Driver) ताबा सुटून टँकर सुमारे चाळीस ते पन्नास फूट खोल दरीत जाऊन कोसळला.

- Advertisement -

केळवंडी (Kelwandi) गावापासून घाट सुरु झाल्यांनतर तिसर्‍या वळणावर माणिकदौंडी (Manikdaundi) गावाकडून येणारा हा टँकर ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूचा लोखंडी स्वरंक्षण कठडा तोडून टँकर (Tanker) खाली जाऊन पडला. नव्यानेच झालेल्या बारामती -अमरापूर (Baramati-Amarapur) हा राज्य मार्गने वाहतूक वाढली असून माणिकदौंडी घाटात अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. या घाटात अनेक धोकादायक वळणे आहेत. सातत्याने अपघाताची मालिका घाटात सुरूच आहे. या घाटातील धोकादायक वळणे काढून रस्त्याच्या बाजूचे हे स्वरंक्षण कठाडे पक्का सिमेंटचे असावेत अशी मागणी माजी पंचायत समितीचे सदस्य विष्णुपंत पवार (Vishnupant Pawar) यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या