Saturday, May 18, 2024
HomeजळगावAccident टँकरची दुचाकीला धडक ; दोघांचा मृत्यू

Accident टँकरची दुचाकीला धडक ; दोघांचा मृत्यू

नशिराबाद, जळगाव – jalgaon

जळगाव शहरासह परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून पुन्हा जळगाव-भुसावळ महामार्गावर नशिराबाद नजीक आईलने भरलेल्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकी क्र. एम.पी. ४८ एमआर ५३९७ ला भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरूणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी नशिराबाद पोलीस ठाण्याचे पो.कर्मचारी यांनी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. मयतांची ओळख पटली नसून पोलुीस कार्यवाही सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या