Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : तपोवन परिसरात आढळली बिबट्याची 3 पिल्ले

Ahilyanagar : तपोवन परिसरात आढळली बिबट्याची 3 पिल्ले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तपोवन रस्त्यावरील ढवणवस्ती परिसरात असलेल्या कराळे मळ्यात मंगळवारी (25 नोव्हेंबर) दुपारी ऊसाच्या शेताशेजारी बिबट्याची 3 पिल्ले आढळली. वनविभागाच्या पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेत ही पिल्ले ताब्यात घेतली. तसेच मादी बिबट्याला पकडण्यासाठी दुपारी त्या परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे.

- Advertisement -

सावेडी कचरा डेपोजवळ असलेल्या कराळे मळ्यातील शेतात काही महिला व पुरूष काम करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना बिबट्याची 3 पिल्ले दिसली. त्यांनी परिसरातील नागरिकांना ही माहिती दिल्यावर तेथे पिल्लांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही तरूणांनी तर या पिल्लांना हातात घेत मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ काढले. काही तरूण पिल्लांना हातात घेत असल्याचे पाहून मादी बिबट्या ऊसाच्या शेतातून बाहेर आली.

YouTube video player

मात्र मोठ्या संख्येने असलेले नागरिक पाहून मादी बिबट्या पुन्हा ऊसाच्या शेतात पळाली. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे पथकासह त्या ठिकाणी धाव घेत बिबट्याची पिल्ले ताब्यात घेतली.

ताज्या बातम्या

Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची...

0
दिल्ली । Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल...