Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRatan Tata Passes Away : तब्येत खालावलेल्या कर्मचाऱ्यासाठी विमान उडवायला तयार झालेले...

Ratan Tata Passes Away : तब्येत खालावलेल्या कर्मचाऱ्यासाठी विमान उडवायला तयार झालेले रतन टाटा; नेमकं काय घडलेलं?

मुंबई | Mumbai
उद्योग विश्वात आपल्या अतुलनीय योगदानाचा अमूल्य ठसा उमटवलेले भारतीय उद्योगविश्वासचे महर्षी रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वाचा आधारवडच हरपलाय. परोपकारी स्वभाव, सामाजिक जाणीव यामुळे रतन टाटा हे सर्वच स्तरातील लोकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते. ते केवळ एक चांगले उद्योगपतीच नव्हे, तर, एक चांगले व्यक्तीही होते. ते आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मच्यांवरही अत्यंत प्रेम करायचे. आज आम्ही आपल्याला त्यांच्या आयुष्यातील एक असा किस्सा सांगणार ओहोत, जेव्हा ते आपल्या कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः विमान उडवायलाही तयार झाले होते.

२००४ साल ची ही घटना आहे. पुण्यातील टाटा मोटर्सचे एमडी प्रकाश एम तेलंग यांची अचानक तब्येत खालावली. त्यांना आधी पुण्यातल्या रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. रविवार असल्याने डॉक्टरांना एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणे शक्य नव्हते. याबाबत रतन टाटा यांना सांगितल्यावर त्यांनी कंपनीचे विमान स्वतः उडवण्यास होकार दिला. रतन टाटा यांच्याकडे पायलटचा परवाना होता. पण, त्याचवेळी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली आणि प्रकाश यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आले. दरम्यान, तब्बल ५० वर्ष टाटा मोटर्समध्ये काम केल्यानंतर प्रकाश २०१२ मध्ये निवृत्त झाले.

- Advertisement -

प्रशिक्षित पायलट
रतन टाटा हे एक प्रशिक्षित पायलट होते. त्यांच्याकडे विमाने उडवण्याचा परवाना होता. त्याच्याकडे Dassault Falcon 2000 प्रायव्हेट जेटही होते, ज्याची किंमत सुमारे १५० कोटी रुपये एवढी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात ते एका फायटर प्लेनच्या कॉकपिटमध्ये दिसले होते. हा फोटो २०११ चा आहे, तेव्हा त्यांनी बेंगळुरू एअरशोमध्ये बोईंगच्या F-18 सुपर हॉर्नेट विमानातून उड्डाण केले होते. २८ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त त्यानी हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होता.

रतन टाटा यांना विमान उडवण्याची आवड वारसाने मिळाली, असे म्हटले तरी खोटे ठरणार नाही. त्यांचे गुरू जेआरडी टाटा हे देशातील पहिले परवानाधारक पायलट होते. जेआरडी टाटा यांनी पहिल्यांदाच कराचीहून मुंबईला विमान उडवले. त्यांनीच टाटा एअरलाईन्स सुरू केली. नंतर त्याचे नाव एअर इंडिया झाले आणि त्याचे राष्ट्रीयीकरण झाले. त्यानंतर, एअर इंडिया आता टाटा समूहाकडे परतली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या