Wednesday, October 23, 2024
Homeनगरशिक्षक बँक गुरुमाऊली-गुरुकुल मंडळाच्या ताब्यात

शिक्षक बँक गुरुमाऊली-गुरुकुल मंडळाच्या ताब्यात

11 संचालकांनी दिली बापू तांबे यांना सोडचिठ्ठी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

परस्पर निर्णय घेवून एकाधिकारीशाही प्रमाणे वागणार्‍या बापू तांबे यांना सोडचिठ्ठी देऊन आम्ही गुरुमाऊली-गुरुकुल मंडळात प्रवेश करत आहोत. यापुढे शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली काम करू, असे सांगत प्राथमिक शिक्षक बँकेच्या 11 संचालकांनी व गुरुमाऊली मंडळ जिल्हाध्यक्ष सुरेश निवडूंगे, राजकुमार साळवे, किसन खेमनर व शेकडो कार्यकर्त्यांनी तांबे गटाला कायमची सोडचिठ्ठी दिली.

- Advertisement -

राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यनेते संभाजी थोरात, राज्य उपनेते रावसाहेब रोहकले, संपर्क नेते डॉ.संजय कळमकर, राष्ट्रिय सरचिटणीस बाळासाहेब झावरे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, अविनाश निंबोरे, सुदर्शन शिंदे, नारायण राऊत, जयश्री झरेकर, संगीता कुरकुटे, नितीन काकडे, राम निकम, अरुण आवारी, गजानन जाधव, बाळासाहेब सालके, राजू मुंगसे, अमोल साळवे, किसन बोरुडे, बाळासाहेब देंडगे उपस्थित होते. याप्रसंगी थोरात म्हणाले, अविवेकी नेत्याचे नेतृत्व बँकेला बाधक ठरते. शिक्षकांचे प्रश्न न सोडवता फक्त बँकेसाठी जन्माला आलेले नेतृत्व जास्तकाळ टिकत नसते. आता संचालकांनी विश्वासात घेऊन सभासदांना नेता मानून कारभार करा. राज्यपातळीवर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही दिवसाची रात्र करतो.

आठ- आठ दिवस मुंबईला मुक्काम ठोकून शिक्षकांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करतो. संसार सोडून शिक्षकांसाठी झटतो. परंतु काही निष्क्रीय माणसे आमच्याविषयी राज्यात गैरसमज पसरवतात. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आम्हाला स्थान देतात, ती ताकद माझी नसून राज्यातील शिक्षकांची आहे. यापुढे शिक्षकांच्या समन्वयला बाजूला सारून आम्हाला आमच्याच ताकदीवर प्रश्न सोडवावे लागतील. बँकेचे अध्यक्ष सरोदे म्हणाले, संघाला अपेक्षित असा सभासदाभिमुख कारभार आम्ही करू. यापुढे बँकेत गुरुमाऊली गुरुकुलची सत्ता असेल. शिक्षकनेते साळवे म्हणाले, तांबेंना सत्तेचा हव्यास नडला. नेत्याला संचालकांचा भत्तासुद्धा पुरला नाही. संघात प्रवेश केलेले गुरुमाऊलीचे अध्यक्ष सुरेश निवडूंगे म्हणाले, रोहकले गुरुजींचा घात करणार्‍याला आम्ही बँकेबाहेर काढले. संचालकांच्या परस्पर अनेक आर्थिक उद्योग होत होते ते आता बंद होतील.

काही नेते प्रवाशापासून लांब
जिल्हा शिक्षक बँकेच्या गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनामध्ये सक्रिय असणारे गुरूमाऊली मंडळाचे राहुरी, पाथर्डी आणि राहाता तालुक्यातील शिक्षक नेते संचालक मंडळाच्या संघाच्या प्रवेश सोहळ्यापासून लांब असल्याचे दिसून आले. तर गेल्या अनेक वर्षापासून बँकेपासून लांब असणारे नेते या निमित्ताने पुन्हा सक्रिय झालेल्याचे दिसून आले. यामुळे नगर जिल्ह्यात पुढील काही महिन्यांत शिक्षकांच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडणार असल्याचे संकेत मिळत आहे.

यांनी केला संघात प्रवेश
बाळासाहेब सरोदे (चेअरमन), रमेश गोरे (उपाध्यक्ष) भाऊराव राहिंज, संतोष राऊत, माणिक कदम, सूर्यकांत काळे, अण्णा आभाळे, कैलास सारोक्ते, बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे, शिवाजी कराड यांचा समावेश असून अजून 3 संचालक लवकरच संघात प्रवेश करतील, असे अध्यक्ष सरोदे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या