Monday, November 11, 2024
Homeनगरशिक्षक मतदार संघाचे आज चित्र स्पष्ट होणार

शिक्षक मतदार संघाचे आज चित्र स्पष्ट होणार

आणखी चौघांची माघार || आज शेवटची मुदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात 36 उमेदवार छाननीत पात्र ठरले आहेत. त्यातील चार उमेदवारांनी काल मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. दरम्यान आज बुधवारी (12 जून) माघारीची अंतिम मुदत आहे, त्यामुळे किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात याकडे लक्ष लागले आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात 38 पैकी दोन उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र छाननीत अवैध ठरले. 38 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. त्यापैकी 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अमोल बाळासाहेब दराडे आणि सारांश महेंद्र भावसार यांचे वय 30 वर्षापेक्षा कमी असल्याने त्यांची नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली आहेत. किशोर भिकाजी दराडे यांच्या शपथपत्राबाबत उमेदवार रणजित नानासाहेब बोठे यांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला होता, तो कायदेशीर तरतुदीनुसार फेटाळण्यात आला व किशोर दराडे यांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

दरम्यान मंगळवारी चार उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामध्ये संदीप नामदेवराव गुळवे-पाटील (कुर्‍हे, संगमनेर), शेख मुखतार अहमद (मालेगाव, नाशिक), किशोर प्रभाकर दराडे (कोकमठाण, कोपरगाव) व रूपेश लक्ष्मण दराडे (येवला, नाशिक) यांचा समावेश आहे. आज बुधवार (12 जून) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची अंतिम मुदत असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

माघार कोण घेणार..
या निवडणुकीत नगर जिल्ह्यातून विवेक कोल्हे, डॉ. राजेंद्र विखे, आप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब कचरे अशा चार प्रमुख उमेदवारांसह अन्यही काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे माघारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या