Wednesday, July 3, 2024
Homeनगरशिक्षक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे

शिक्षक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे

सर्वाधिक संगमनेर तालुक्यात || सूक्ष्म निरीक्षक, सहायक, फिरत्या पथकांची नियुक्ती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात 20 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. संगमनेरमध्ये सर्वाधिक 3 केंद्रे आहेत. मतदान केंद्राध्यक्षांसह सूक्ष्म निरीक्षक, सहायक, फिरत्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण 17 हजार 441 मतदारांपैकी संगमनेर, राहाता, नगर व कोपरगाव या चार तालुक्यांतच निम्मे मतदार नोंदवले गेले आहेत.

नाशिक मतदारसंघात नाशिकसह नगर, धुळे, जळगाव व नांदूरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण 64 हजार 802 मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात 23 हजार 597, धुळ्यात 8 हजार 88, जळगावमध्ये 13 हजार 56, नंदुरबार जिल्ह्यात 5 हजार 419 तर नगर जिल्ह्यात 17 हजार 441 मतदार समाविष्ट आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात 20 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी संगमनेर व नगर शहरात प्रत्येकी 3 केंद्रे आहेत. राहाता व कोपरगावमध्ये प्रत्येकी 2 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी 1 केंद्र निवडणूक यंत्रणेने निश्चित केले आहे. मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम मतदारांना नोंदवायचा आहे. त्यामुळे नाम साधर्म्याचा उमेदवारांना कितपत फायदा होतो, याविषयी साशंकता आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्षांसह दोन सहायक मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, शिपाई असे पाच कर्मचारी निवडणूक कामकाज सांभाळतील. याव्यतिरिक्त फिरत्या पथकात एक व्हिडिओ ग्राफर, व्हिडिओ निरीक्षक व दोन पोलिसांचा समावेश आहे.

मतदान केंद्र व मतदार संख्या
अकोले 1010 (1), संगमनेर 2409 (3), राहाता 2107 (2), कोपरगाव 2176 (2), श्रीरामपूर 1009 (1), नेवासा 1110 (1), शेवगाव 893 (1), पाथर्डी 938 (1), राहुरी 973 (1), पारनेर 702 (1), नगर 2233 (3), श्रीगोंदा 899 (1), कर्जत 636 (1), जामखेड 335 (1).

- Advertisment -

ताज्या बातम्या