Friday, May 3, 2024
Homeनगरशिक्षकांच्या बदल्यांबाबत निर्णय नाही

शिक्षकांच्या बदल्यांबाबत निर्णय नाही

संगमनेर|वार्ताहर|Sangmner

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 31 जुलैपूर्वी राज्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले होते, तथापि जिल्हा परिषद कर्मचारी यांचे काय होणार? याबाबत उत्सुकता होती. ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने याबाबत आदेश देण्यात आला असून शिक्षक वर्ग वगळता उर्वरित सर्व कर्मचार्‍यांच्या बदल्या शासनाच्या नवीन आदेशाप्रमाणे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisement -

शासनाच्यावतीने यापूर्वी करोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन बदल्या न करण्याचे धोरण घेण्यात आले होते. 31 मे पूर्वी बदल्या करणे अपेक्षित असताना शासनाने बदल्यांना स्थगिती दिले असल्याचे आदेश काढले. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांनी यावर्षी बदल्या होणार नाहीत असे समजून कामास सुरुवात केली होती.

तथापि दोन दिवसापूर्वी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने राज्य शासनाच्या सर्व विभागांना 31 जुलैपूर्वी या पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे एकूण कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात याव्यात असे सूचित केले आहे. तथापि राज्याच्या जिल्हा परिषद विभाग अंतर्गत येणार्‍या शिक्षण, आरोग्य, बांधकाम, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण यासारख्या विभागातील कर्मचार्‍यांच्या बंद होणार किंवा कसे याबाबत स्पष्टता नव्हती.

अखेर राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने गुरुवारी दुपारी या संदर्भात आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन स्वरूपात होत असल्यामुळे त्यांना वगळून उर्वरित सर्व विभागातील क व ड श्रेणीतील कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्याचे आदेशित केले आहे. या सर्व बदल्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे करण्यात याव्यात. पंधरा टक्क्या पेक्षा अधिक बदल्या होणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याचे आदेशित करण्यात आले आहे.

राज्यात गेले तीन-चार वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्यस्तरावरून ऑनलाईन स्वरुपात करण्यात येत आहे. त्याबदल्या संदर्भात राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटना गेले काही वर्ष आक्रमक झालेल्या आहेत. त्यात शिक्षक संघटनांमध्ये देखील मतभेद आहेत. त्यामुळे मागील सरकारने यासंदर्भात ताठर भूमिका घेतली होती. तथापि नव्याने स्थापन झालेल्या आघाडी सरकारच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या पाच सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे. शासनाने त्यातील कोणत्या शिफारशी स्वीकारल्या याबाबत अद्याप धोरण जाहीर झालेले नाही. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या करावयाच्या झाल्यास ग्रामविकास विभागाला स्वतंत्र आदेश जारी करावे लागतील. त्या आदेशानंतर ऑनलाईन सॉफ्टवेअर सिस्टीममध्ये योग्य ते बदल करावे लागतील. त्यानंतरच बदल्यांची कार्यवाही होऊ शकणार आहे. त्यामुळे तूर्त तरी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या