Thursday, February 5, 2026
HomeनगरAhilyanagar : बदलीसाठी गुरुजी बनले ‘लुळे पांगळे’

Ahilyanagar : बदलीसाठी गुरुजी बनले ‘लुळे पांगळे’

बदली अर्जासाठी दाखल केलेल्या अर्जांची पडताळणीची मागणी

अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे

नगर जिल्ह्यात 2012 प्रमाणे पुन्हा बोगस अपंग शिक्षक घोटाळा उघड होण्याची चर्चा प्राथमिक शिक्षकांच्या वर्तुळात सुरू आहे. 2025 च्या बदल्यांमध्ये लाभ मिळावा, यासाठी काहींनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर केला असल्याचा दाट संशय ‘गुरूजीं’ च्या वर्तुळातून व्यक्त होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने बदलीसाठी सादर केलेल्या शिक्षकांच्या अपंग प्रमाणपत्राची तपासणी करण्यासोबत अचानक लुळेू-पांगळे झालेल्यांची चौकशीची मागणी होत आहे. दरम्यान 2012 मध्ये असाच बनावट अपंग प्रमाणपत्र घोटाळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने उघडकीस आणला होता. त्यावेळी 75 बनावट अपंग जिल्हा परिषदेच्या हाती लागले होते.

- Advertisement -

दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांमध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि संशोधनाचा विषय म्हणजे बदल्यांचा असतो. बदलीमध्ये सवलत मिळावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने विशेष संवर्ग 1, पत्नी एकत्रिकरण आणि अन्य सवलती दिलेल्या आहेत. यात विशेष संवर्ग म्हणजे स्वत: अपंग असणे अथवा दुर्धर आजाराने पीडित असणे, अथवा अपंग मुलांचे पालक यांचा यात समावेश आहे. या सवलतीचा आधार घेण्यासाठी यापूर्वी जिल्ह्यातील अनेक शिक्षक कृत्रिम अथवा बनावट अपंग झाल्याचे समोर आलेले आहे.

YouTube video player

यामुळे अशा बनावट अपंग प्रमाणपत्रांची दरवर्षी शिक्षण विभागाकडून पडताळणी आवश्यक आहे. शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रानूसार त्यांना बदलीत सवलत मिळते.2012 मध्ये अशा प्रकारे बदली टाळण्यासाठी अथवा बदलीचा लाभ घेण्यासाठी 75 शिक्षकांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे तत्कालीन शिक्षणाधिकारी दिनकर टेमकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या तपासणीत समोर आले होते. त्यानंतर हे प्रकरण अनेक वर्षे सुरू होते.

अशीच परिस्थिती 2025 मध्ये बदली टाळण्यासाठी अथवा व्हावी, यासाठी काही शिक्षकांनी बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्याची चर्चा सुरू आहे. ही चर्चा खरी की खोटी याचा तपास व्हावा, यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदलीसाठी सादर केलेल्या शिक्षकांच्या आजारनिहाय प्रमाणपत्र पडताळणीची गरज निर्माण झाली आहे. सुत्रांच्या माहितीनूसार यंदाच्या बदलीच्या प्रक्रियेत सवलत घेण्यासाठी अनेक अपंग अथवा वैद्यकीय प्रमाणपत्रात गोंधळ असल्याची चर्चा आहे. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी शिक्षण विभागाने आता जिल्ह्यातील अपंग शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणीची गरज निर्माण झाली आहे.

बनावट घटस्फोटीची यापूर्वी तक्रार
जिल्ह्यात दक्षिणेतील एका शिक्षकाच्या पत्नीने बनावट घटस्फोटाची तक्रार काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केलेली होती. त्यावेळी दै. सार्वमतने ‘माझ्या नवर्‍याची बायको’ या मथळ्याखाली बातमी देखील प्रसिध्द केली होती. यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीत घटस्फोटीतच्या नावाखाली बदलीचा लाभासाठी अर्ज केलेल्या प्रकरणाची चौकशीची गरज निर्माण झाली आहे.

अद्याप बदल्यांची प्रतिक्षा
यंदा 15 जून महिनासंपाला असून शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, अद्याप शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया झालेली नाही. शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज दाखल केलेले असून दाखल अर्जानूसार त्यांचे वर्गीकरण करून शिक्षण विभाग राज्य पातळीवरून बदली आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. शिक्षकांची बदलीची प्रक्रिया होण्या आधी अपंग प्रमाणापत्रासह अन्य वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांची चौकशी करून बदल्यांची प्रक्रिया राबवण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.

36 प्रस्ताव केले अपात्र
दरम्यान, जिल्ह्यात बदली दाखल प्रस्तावापैकी अपंग अथवा वैद्यकीय दाखल केलेल्या प्रस्तावांपैकी गटशिक्षणाधिकारी यांंच्या पडताळणी समितीने 36 शिक्षकांचे प्रस्ताव अपात्र केलेले आहेत. हे प्रस्ताव अपात्र केले म्हणजे त्यांच्या प्रमाणापत्रात त्रुटी अथवा ते बनावट असल्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात हे प्रस्ताव अपात्र केल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणखी खोलवर तपासणी करण्याच्या तयारी असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

गंभीर आजारी शिक्षक चालवतात चारचाकी
जिल्ह्यात अनेक शिक्षकांनी वेगवेगळी अपंग प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. तर काही गंभीर आजाराने पीडित असूनही ते दुचाकी, चारचाकी वाहन अशी चालवू शकतात, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर काहींचे गंभीर आजार आता बरे झालेले असून ते जुन्याच प्रमाणपत्र सादर करून बदलीसाठी संवर्ग एकमध्ये दाखल झाल्याची देखील कुजबुज सुरू आहे.

ताज्या बातम्या

Crime News : शिक्षिकेची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968...