Friday, May 3, 2024
Homeनगरशिक्षक बँक : सभासदांच्या ठेवीतून परस्पर काढले सात हजार

शिक्षक बँक : सभासदांच्या ठेवीतून परस्पर काढले सात हजार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत संचालक मंडळाने परस्पर सभासदांच्या ठेवीतून परस्पर 7 हजार रुपये काढून घेतले आहेत. हे सभासदांना माहित आहे ? सवाल सदिच्छा, बहूजन, शिक्षक संघ व साजिर महिला आघाडीचे नेते विलासराव भांड व अमोल साळवे यांनी केला आहे.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षकांच्या हक्काच्या पगारातुन दरमहा कपात होणार्‍या मयत निधीमधून शिक्षक सभासद यांना न विचारता, त्यांची मंजूरी न घेता, परस्पर गुरूमाऊलीच्या संचालकांनी सात हजार काढले आहेत.करोना काळात झालेल्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत, वार्षिक अहवालात ठराव घेऊन, चर्चा न करता ऑनलाईनच ठराव मंजुर केला. सभासदांची सही न घेता त्यांचे पैसे परस्पर दुसरीकडे कसे वळवले? उद्या सभासदांच्या कायम ठेवी, मुदत ठेवीला धक्का लावतील.

सत्ताधारी संचालकांनी ज्या कारणासाठी पैसे काढले, त्यासाठी नफ्यातुन काही प्रमाणात तरतुद करता आली असती. पण यांना निवडणुकीसाठी नफा जादा दाखवायचा होता. तसेच सभासद सेवानिवृत्त झाल्यावर हे पैसे देणार आहे असे सत्ताधारी सांगत असले तरी प्रत्येक सभासदांची लेखी परवानगी आवश्यक होते. परस्पर ठेवीतून पैसे घेणे बराबर नाही, असे भांड आणि साळवे यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या