Wednesday, May 7, 2025
Homeमुख्य बातम्याRohit Sharma : मोठी बातमी! रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटबाबत मोठा निर्णय !

Rohit Sharma : मोठी बातमी! रोहित शर्माचा कसोटी क्रिकेटबाबत मोठा निर्णय !

Rohit Sharma Retirement : टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (Team India Captain Rohit Sharma) याने आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा (Test Cricket Retirement) केली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. रोहितने टी 20 वर्ल्ड कप 2024 मधील विजयानंतर सर्वात छोट्या फॉर्मेटला अलविदा केला होता. आता हिटमॅन म्हणून ओळखला जाणार्‍या रोहितने बुधवार 7 मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत कसोटी क्रिकेटला (Test Cricket) रामराम ठोकला आहे.

रोहितने इंस्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये लिहिले की, सर्वाना नमस्कार, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे, ही गोष्ट मी शेअर करत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये माझ्या देशाचं नेतृत्त्व करणं हा सन्मान आहे. इतक्या वर्षांच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद. मी भारताचं प्रतिनिधीत्व एकदिवसीय सामन्यांमध्ये करत राहीन. असे लिहीले आहे.

- Advertisement -

दरम्यान रोहितची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशापक्रारे तडकाफडतकी निवृत्ती घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. रोहितने याआधी काही महिन्यांपूर्वी टी 20 क्रिकेटमधून अशाच प्रकारे निवृत होत असल्याचं जाहीर केलं होतं. रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्डकप (T 20 World Cup) जिंकून दिला होता. रोहितने त्या ऐतिहासिक विजयानंतर टी 20 क्रिकेटला अलविदा केला होता. तेव्हा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दोघांनीही टी 20 क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासनाच्या निर्देशानुसार काही भागातील विमान सेवा बंद

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विमानतळ बंद करण्याबाबत विमान वाहतूक अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, इंडीगो विमान कंपनीने १० मे रोजी सकाळी ५:२९ वाजेपर्यंत श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह,...