Thursday, July 4, 2024
Homeक्रीडाT20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच 'टीम इंडिया' मालामाल, दक्षिण आफ्रिकालाही...

T20 World Cup 2024: वर्ल्ड चँपियन बनताच ‘टीम इंडिया’ मालामाल, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी रक्कम

दिल्ली । Delhi

- Advertisement -

टी-२० विश्वचषकात (T20 World Cup 2024) रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला ७ धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-२० विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ७ बाद १७६ धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने २० षटकात ८ बाद १६९ धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली (Virat Kohli) सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीने दोन्ही संघांना बक्षिसाची रक्कम किती दिली आहे जाणून घ्या.

भारतीय संघाला या यशासाठी भारतीय संघाला ICC कडून २.४५ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे २०.४२ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. याशिवाय, भारतीय संघाला प्रत्येक विजयासाठी स्वतंत्रपणे ३१,१५४ डॉलर्स म्हणजेच अंदाजे २६ लाख रुपये मिळाले. ही सर्व रक्कम एकत्र केली तर भारतीय संघाने या स्पर्धेतून २२.७६ कोटी रुपये कमावले आहेत.

तसेच टी-२० विश्वचषकात पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या आणि या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १.२८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे १०. ६७ कोटी रुपये मिळाले आहेत, जे विजेत्या भारतीय संघाच्या बक्षीस रकमेच्या निम्मे आहे. याशिवाय ८ सामने जिंकण्यासाठी त्यांना सुमारे २.०७ कोटी रुपये वेगळे मिळाले. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतून एकूण १२.७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही आयसीसीकडून बक्षिसांची मोठी रक्कमही मिळाली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ६.५५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याच वेळी, सुपर८ पर्यंत पोहोचलेल्या संघांना ३.१८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुसरीकडे, ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना २.०६ कोटी रुपये मिळाले आहेत. सुप८ पर्यंत प्रत्येक सामना जिंकण्यासाठी संघांना २५.९ लाख रुपये मिळाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या