Saturday, May 4, 2024
Homeनगर‘ती’ वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच पडून

‘ती’ वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच पडून

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तेलिखुंट येथे झालेल्या दगडफेकीतील आरोपींचा शोध अद्यापही सुरूच आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी सुमारे 41 दुचाकी जप्त केल्या आहेत. मात्र, अद्याप निम्म्या दुचाकी मालकांनी आपली गाडी परत नेली नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

तेलिखुंट येथे घोषणाबाजी करत काही समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली होती. यात पोलिसांनाही मार बसला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. तर या प्रकरणात आणखी 19 आरोपी निष्पन्न झाले होते. तसेच घटनास्थळावरून कोतवाली पोलिसांनी 41 दुचाकी वाहने जप्त केली होती. यातील काही वाहन मालक आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून अद्यापही आरोपींचा शोध सुरू आहे.

जप्त केलेली वाहने सोडविण्यासाठीही निम्म्या वाहन मालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आपली वाहने परत नेली आहेत. गुन्ह्याशी या व्यक्तींचा संबंध आहे की नाही, याची खातरजमा करून पोलिसांनी वाहने परत केली आहेत. मात्र, अद्यापही 21 वाहने कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत. या वाहनांच्या आधारेही पोलिसांकडून आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या