नाशिक | Nashik
यंदाच्या संततधार पावसानंतर राज्यात आता थंडीची (Cold) चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्र, विशेषतः नाशिक आणि महाबळेश्वरमध्ये काल (सोमवारी) राज्यातील सर्वात कमी तापमान (Temperature) १२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर काल नाशिकचे कमाल २७.५ अंश सेल्सिअस होते.
राज्याच्या उत्तरेकडील भागात थंडीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पारा खाली घसरत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता हिवाळा सुरू झाल्याचे जाणवत आहे. पुढील आठवड्यातही थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे.आज मंगळवार (दि.२६) नोव्हेंबरपर्यत महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नसल्याने व आकाश निरभ्रतेतून सकाळ-संध्याकाळी थंडीत अजुन अधिक वाढ जाणवत आहे.
दरम्यान, काल (सोमवार) नाशिकचे किमान तापमान चक्क बारा अंशांवर (Degrees) आले होते. कमाल तापमानही २७ अंशांवर आले होते. दुपारचे कमाल तापमान तीन दिवसापर्यंत ३१ तर पहाटेचे किमान तापमान १५ ते १६ डिग्रीच्या दरम्यान होते. यानंतर मंगळवारनंतरही थंडीतील सातत्य हे टिकून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आला थंडीचा महिना झटपट शेकटू पेटवा म्हणत शेकोट्या पेटत आहेत. तसेच उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.
निफाडचे तापमान १० अंशावर
‘
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून निफाडचा (Niphad) पारा १० अंशावर पोहचला आहे. नाशिक आणि निफाडचे किमान तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले आहे. यासोबतच यंदाच्या हिवाळी हंगामातही आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर आज मंगळवार (दि.२६) रोजी पारा आणखी घसरला तर किमान तापमान एक आकड्यावर पोहचणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा