Tuesday, March 25, 2025
Homeनगरटेम्पोच्या धडकेत तरूण जागीच ठार

टेम्पोच्या धडकेत तरूण जागीच ठार

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

राहुरी-मांजरी रस्त्यावरील (Rahuri Manjari Road) मानोरी येथील चंडकापूर रस्त्यावर पायी चाललेल्या तरुणाला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोंने जोराची धडक (Tempo Hit) दिल्याने त्यातच त्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू (Youth Death) झाल्याची घटना घडली आहे. रवींद्र राजेंद्र बर्डे (वय 25) राहणार चंडकापुर ता.राहुरी असे या मृत तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

मानोरी (Manori) येथील चंडकापूर फाटा येथे बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी अपघात घडला आहे. राहुरी (Rahuri) तालुक्यातील चंडकापूर येथुन पायी मानोरीला चाललेल्या या तरूणाला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने धडक दिली. यामध्ये हा तरूण गंभीरीरीत्या जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी तात्काळ स्थानिकांनी धाव घेऊन मदकार्य केले. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविला. मृत रविंद्र बर्डे हा चंडकापूर येथे रहिवसी होता. मजुरी करून तो आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह करत होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.

दरम्यान, राहुरी मांजरी (Manori) रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहेत तसेच अनेकांना अपंगत्वही आले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...