नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
मुंबईत 6 डिसेंबरला भारतीय राज्य घटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मुंबई, नाशिकरोड, मनमाडसह प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. दि. 2 ते 9 डिसेंबरदरम्यान ही बंदी असेल.
हे देखील वाचा– NCP Sharad Chandra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेते पदी जितेंद्र आव्हाड यांची निवड
प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची हालचाल सुरळीत करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, मनमाड, बडनेरा, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, नागपूर, वर्धा, पुणे, सोलापूर या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा