नाशिक । प्रतिनिधी Nashik
हे देखील वाचा – देशदूत ई पेपर १ डिसेंबर २०२४
विधान सभेच्या निवडणूक निकाला नंतर महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव निर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक संपन्न झाली.दरम्यान बैठ्कीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे.
हे देखील वाचा – Political News : महायुतीच अखेर ठरल! राज्यात ५ डिसेंबरला स्थापन होणार नवं सरकार
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे कडून विधीमंडळ गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्याच बरोबर दिवंगत नेते आर.आर. पाटील यांचे सुपुत्र व देशातील सर्वात तरुण आमदार असलेल्या रोहित पाटील यांना मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर यांना देखील प्रतोदपदी कार्यभार देण्यात आला आहे.
हे देखील वाचा Cyclone Fengal : फेंगल चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका किती?
विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा जिंकल्या आहेत. यात विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांबाबत आज निर्णय झाला नाही, आजच्या बैठकीला बीडचे आमदार संदीप क्षीरसागर उपस्थित नव्हते.आज 9 सदस्य उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा