Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकNashik Accident News : दसरा मेळाव्याला जाणाऱ्या बसचा अपघात; १० जण...

Nashik Accident News : दसरा मेळाव्याला जाणाऱ्या बसचा अपघात; १० जण जखमी

इगतपुरी | Igatpuri

आज सायंकाळी मुंबईत (Mumbai) होणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या (Shinde Faction ShivSena) दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) यवतमाळहून (Yevtmal) जाणाऱ्या खासगी बसला (Bus) नवीन कसारा घाटात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १० जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे…

- Advertisement -

मुंबई पोलिसांची नाशिकमध्ये मोठी कारवाई; गिरणा नदीपात्रातून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कसारा घाटाच्या (New Kasara Ghat)वळणावर एक साईटला (सीजी-०४-जेडी-९२०५) बंद पडलेला ट्रक उभा होता. या ट्रकच्या (Truck) पाठीमागे जीप क्रमांक (एमएच ०४-एलई-०२३१) थांबली होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेने कार्यकर्त्यांना घेऊन जाणाऱ्या बसचे (एमएच ०४-एफके-०३९९) ब्रेक निकामी झाल्याने ती ट्रक आणि जीपला धडकली. त्यात बसमधील दहा प्रवासी जखमी झाले. यातील दोघे गंभीर जखमी आहेत.

Nashik Crime News : महिलेची तीन लाखांची ऑनलाईन फसवणूक

दरम्यान, यावेळी महामार्ग पोलीस केंद्र घोटी, रूट पेट्रोलिंग, आपत्ती व्यवस्थापन टीमच्या कर्मचाऱ्यांनी (Management Team) तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालय आणि कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Sushma Andhare : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढणार; मंत्री दादा भुसेंनी पाठवली नोटीस

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : आयशर-कारच्या अपघातात पती-पत्नी ठार; मुलगी गंभीर जखमी

0
ओझे | विलास ढाकणे | Oze दिंडोरी-वणी रस्त्यावरील (Dindori-Vani Road) वलखेड फाट्यावर झालेल्या आयशर व कार यांच्यात झालेल्या अपघातामध्ये (Accident) पती-पत्नी जागीच ठार (Killed)...