Saturday, April 26, 2025
Homeक्रीडासर्बियाचा स्टार टेनिसपटू 'नोवाक ज्योकोविच' यूएस ओपनमधून बाहेर

सर्बियाचा स्टार टेनिसपटू ‘नोवाक ज्योकोविच’ यूएस ओपनमधून बाहेर

दिल्ली | Delhi

जगातील आघाडीचा टेनिसपटू नोवाक ज्योकोविच(novak djokovic) याला यूएस ओपनमधून(US Open) बाहेर पडावं लागलं आहे. नोवाक ज्योकोविच यूएस ओपनचा प्रबळ दावेदार समजला जात होता. ‘डीफॉल्ट’ ठरल्याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

- Advertisement -

पहिल्या सेटमध्ये चौथ्या फेरीत प्रतिस्पर्धी पाब्लो कॅरेनो बुस्टा याने जोकोविचला 6-5 ने पिछाडीवर टाकले, तेव्हा अनवधानाने त्याने मारलेला चेंडू लाईन जजच्या घशावर लागला. ग्रॅण्ड स्लॅममध्ये नियम आहे की, “कोणताही खेळाडूने एखाद्या अधिकारी किंवा प्रेक्षकाला जखमी केलं तर त्याच्यावर दंड ठोठावून त्याला अपात्र ठरवलं जातं.” सामनाधिकाऱ्यांनी नोवाक ज्योकोविचला या प्रकारासाठी दोषी ठरवलं आहे. नियमानुसार, यूएस ओपनच्या प्री-क्वार्टर सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्योकोविचला जी रक्कम मिळेल, त्यावर दंड म्हणून कपात केली जाईल. तसंच या चुकीसाठी त्याचे रँकिंग पॉईंट्सी कमी केले जातील.

नोवाक ज्योकोविचने घडलेल्या प्रकाराबद्दल इन्स्टाग्रामवर खेद व्यक्त केला. ही घटना अतिशय दु:खद आणि चुकीची असल्याचं त्याने म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या