Tuesday, October 22, 2024
Homeदेश विदेशRajasthan Dholpur Accident : लक्झरी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात, ८ चिमुकल्यांसह...

Rajasthan Dholpur Accident : लक्झरी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात, ८ चिमुकल्यांसह ११ जणांचा मृत्यू

धौलपूर | Dholpur

राजस्थानमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या धौलपूरमध्ये लक्झरी बस आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात ८ लहान मुलांसह ११ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

मृतांमध्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या अपघातात काही जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पोतील सर्व हे बारी शहरातील गुमट मोहल्ला येथील रहिवासी होते. हे लोक बरौली गावात भात कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. तेथून परताना सुनीपूर गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. ये-जा करणाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी टेम्पोतून मृतदेह बाहेर काढले.

या अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला आहे. रस्त्यावर रस्त्यावर टेम्पोचे तुटलेले भाग विखुरलेले दिसले. तर बसची काचही फुटली होती. ही टक्कर इतकी जोरदार होती की टेम्पोच्या मागे बसलेले लोक टेम्पोतच अडकून पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर काही लोक रस्त्यावर फेकले गेले.

अपघाताची माहिती मिळताच बाडी जिल्ह्याचे अतिरिक्त एसपी एडीएफ कमल कुमार जांगीड, बाडीचे उपजिल्हाधिकारी दुर्गा प्रसाद मीना, बाडीचे सर्कल ऑफिसर महेंद्र कुमार मीना, बाडी सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी विनोद कुमार हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अपघाताच्या स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनानं जखमींवर तातडीनं उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या