नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक, राज्यात नव्हे तर देशभरात वन्यप्राणी (Wild Animals) आणि मानवाचा संघर्ष वेगाने वाढतांना दिसून येत आहे आणि या प्रत्येकाच्या मर्यादा आणि हक्काचा प्रश्न निर्माण झाला आहे. विदर्भाच्या जंगलातील वाघाच्या (Tiger) शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या ‘टेरिटरी’ हा चित्रपट (Territory Movie) येत्या १ सेप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असून या चित्रपटातून लहान मुले,शहरी भागातील रहिवासी व प्राणी प्रेमींना निसर्गाच रूप बघायला मिळणार आहे…
Nashik News : कर नाही, रेशन नाही! गोरठाण ग्रामपंचायतीच्या अजब ठरावाने खळबळ
देशदूतच्या विशेष संवाद कट्ट्यात ‘टेरिटरी’ या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सचिन श्रीराम,चित्रपटात पोलीस निरीक्षकाची भूमिका करणारे कलाकार योगेश कुलकर्णी (Yogesh Kulkarni) यांनी संवाद साधला त्यांची मुलाखत (interview) घेतली आहे देशदूतचे प्रतिनिधी निशिकांत पाटील यांनी.
Sinnar News : पेट्रोल पंप चालकाला पाच हजार रुपयांचा गंडा
निर्माते श्रीराम मुल्लेमवार यांच्या डिव्हाईन टच प्रॉडक्शन्सतर्फे ‘टेरिटरी’ हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला आहे. लेखक-दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्समधील इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनमधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. बऱ्याच चित्रपटांसाठी सहायक म्हणून काम केल्यानंतर आता ते टेरिटरी या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.
कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आहे, पारितोषिकप्राप्त ठरला आहे. तर कृष्णा सोरेन यांनी चित्रपटाचं छायांकन, मयूर हरदास यांनी संकलन, महावीर सब्बनवार यांनी ध्वनि आरेखन, यश पगारे यांनी पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम यांची मुख्य भूमिका आहे.
Sanjay Raut : “दीडशहाणे मंत्री…”; दादा भुसेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा संताप
यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal District) पांढरकवडा येथील जंगलात (Forest) नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो, या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी दिली जाते आणि एक थरारक शोध सुरू होतो. यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील जिवनमान,तिथला निसर्ग, वन्यप्राणी यांचे सुंदर पद्धतीने वर्णन या चित्रपटातून केले असल्याने मोठ्या पडद्यावरच हा चित्रपट बघण्याची मजा आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
केंद्र सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार; नाशिक, अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र