Friday, September 4, 2026
Homeदेश विदेशजम्मु काश्मीरच्या कुलगामध्ये दहशतवादी हल्ला; छत्तीसगढमधील दोन मजुर ठार

जम्मु काश्मीरच्या कुलगामध्ये दहशतवादी हल्ला; छत्तीसगढमधील दोन मजुर ठार

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दक्षिण काश्मीरच्या जम्मू काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांचे सर्च ऑपरेशन (Search Operation) सुरू आहे. कुलगामच्या (Kulgam) केल्लाम परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याने (Terrorist Attack) परिसरात दहशत पसरली आहे. दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छत्तीसगडमधील विटभट्टी कामगारांचा (Migrant Workers from Chattisgadh) मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी श्रीनगरच्या रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अतिरेकी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या मजुरांची संख्या आता दोनवर गेली आहे. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम राबवली जात असून संपुर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.

- Advertisement -

या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेने स्विकारली आहे. दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता कुलगामच्या केल्लम परिसरात दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यात छत्तीसगड येथील एका मजूराचा मृत्यू तर दुसरा कर्मचारी जखमी झाला होता. या जखमी प्रवासी मजूरावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला असून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.

संपादकीय : १ ऑगस्ट २०२६ – ज्ञानमंदिरातील महाघोटाळा

या हल्ल्यात मृत्यू झालेले दोन्ही मजूर हे छत्तीसगढचे असून मृतांमध्ये २४ वर्षीय दीपक रात्रे आणि २८ वर्षीय भुपिंदर असे नाव आहे. कुलगाममधील केलम गावात छत्तीसगडच्या दोन मजुरांना अगदी जवळून गोळी झाडली गेली. त्यापैकी दीपक नावाच्या मजूराचा जागीच मृत्यू झाला. तर भूपींदर नामक दुसऱ्याला अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. इथे त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला श्रीनगर येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला.

शुक्रवारी कुलगाम येथे झालेला अतिरेकी हल्ला हा गेल्या दहा दिवसांतील दक्षिण काश्मीरमधील दुसरा मोठा अतिरेकी हल्ला होता. तसेच ऑक्टोबर २०२४ नंतर स्थलांतरित मजुरांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. २२ जुलै रोजी अतिरेक्यांनी अनंतनाग शहरात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती गटात तैनात असलेल्या पोलिसाला अगदी जवळून गोळ्या घालून ठार केले होते.

ताज्या बातम्या

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकऱ्या; पुणे पोलिसांकडून दोघांना अटक

0
पुणे (प्रतीनिधी) कुराश खेळात प्रावीण्य मिळवल्याची बनावट प्रमाणपत्रे तयार करून क्रीडा कोट्यातील पाच टक्के आरक्षणाचा लाभ घेत सरकारी नोकऱ्या मिळविल्याचा प्रकार पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...