Friday, July 5, 2024
Homeदेश विदेशसिनेगॉग, दोन चर्च आणि एका पोलीस चौकीवर दहशतवादी हल्ला; १५ जणांचा मृत्यू,...

सिनेगॉग, दोन चर्च आणि एका पोलीस चौकीवर दहशतवादी हल्ला; १५ जणांचा मृत्यू, ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
रशियाच्या उत्तर काकेशस प्रदेशातील दागिस्तानमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी एक सिनेगॉग, दोन चर्च आणि एका पोलिस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये सहा पोलीस अधिकारी, चर्चमधील एका फादर यांच्यासह जवळपास १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या कारवाईत रशियन सैनिकांनी ६ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रशियातील डागेस्तान भागात सैन्याचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे.

- Advertisement -

रशियातील रस्त्यांवर टँक आणि स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले असून गेल्या ९ तासांपासून ऑपरेशन सुरू आहे. या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सात अधिकारी, एक धर्मगुरू आणि एका चर्चच्या सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. दागेस्तानमधील डर्बेंट आणि मखाचकला या दोन शहरांमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे शोक दिवस घोषित करण्यात आले आहेत.

https://aninews.in/news/world/asia/attack-on-synagogues-churches-in-russias-dagestan-9-killed-25-injured-terror-probe-launched20240624033031

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी चर्चवर अंदाधुंद गोळीबार केला. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शहरातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच, या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस ‘शोक दिवस’ घोषित करण्यात आले आहेत.

अज्ञात हल्लेखोरांनी सामाजिक परिस्थिती अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला नेमका कोणी आणि का केला याचा शोध सुरू असून मेलेल्या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ लोकांनी चर्चेमध्ये आश्रय घेतला होता. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या हल्ल्यानंतर लोकांना शांतता राखण्याचे आणि घाबरून जाऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या