Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या'सगळा संगीत खुर्चीचा खेळ सुरु'; अनिल परब यांची महायुती सरकारवर टीका

‘सगळा संगीत खुर्चीचा खेळ सुरु’; अनिल परब यांची महायुती सरकारवर टीका

मुंबई | Mumbai

निधी वाटपावरून जे शिंदे गटात गेले ते अजित पवारांवर नाराज होते, आज ते सगळे एकत्र आहेत. आता निधीवरून अजित पवार गटाचे लोक नाराज आहेत हे कळते. त्यामुळे हा सगळा संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. कोणाला कधी खुर्ची मिळतेय, कोण कधी पळतंय हे दिसेल असा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर केला आहे.

- Advertisement -

जातीजातीत तणाव निर्माण होतोय. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायला हवे. परंतु सरकार या विषयात गंभीर नाही असाही आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला आहे.

आमदार अनिल परब म्हणाले की, केवळ ज्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आढळल्या आहेत त्यांनाच प्रमाणपत्र देतील अशा प्रकारचे वातावरण सरकारच्या वतीने केले जात आहे. राज्यात मराठ्यांच्या नोंदी तपासल्या जाता आहे. ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्रे देता आहेत. परंतु जरांगे यांनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी केलीय त्यावर सरकार काय करते हे पाहावे लागेल. जरांगे पाटलांनी डेडलाईन दिली आहे त्यामुळे थोड्या दिवसात कळेलच असे अनिल परब म्हणाले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या