Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याSanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे...

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना मालेगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

नाशिक | Nashik

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळे आज राऊत यांना बदनामीच्या अर्जावर खुलासा करण्यासाठी मालेगाव येथील न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राऊत न्यायालयात खरच हजर राहणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे…

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला होता, असा आरोप केला होता. सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला मूळ लेख हा पुरावा म्हणून भुसे यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.

त्यानंतर भुसे यांनी मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात (Court) ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्यामार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दैनिक सामना या वृत्तपत्रातून बदनामी केल्याचा आरोप खासदार राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे आज खासदार संजय राऊत हे स्वतः मालेगाव न्यायालयात (Malegaon Court) हजर राहतात की वकिलांमार्फत आपले म्हणणे मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, दुसरीकडे ड्रग्ज (Drugs) माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांचे नाव घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. यानंतर मंत्री दादा भुसे यांनी आरोपांचे खंडन करत माझी नार्को टेस्ट करा, कधीही चौकशी करा, असे म्हटले आहे. तर दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्जविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी राऊत यांनी नाशिकमधील सहा आमदारांना हफ्ते मिळत होते, अशी टीका देखील केली होती.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या