दिल्ली | Delhi
शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांनी बंड केलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा (ठाकरे आणि शिंदे) युक्तीवाद ऐकला, व त्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. यासंदर्भात 31 ऑक्टोबरला पार पडणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. दरम्यान निवडणूक रोखे (इलेक्ट्रोल बॉंड) संदर्भात सुनावणी असल्यानं पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलल्याचे वृत्त समोर आले आहे.
आता सुनावणी दिवाळीनंतर ( Hearing After Diwali) होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचा निकाल हा एकतर्फी आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवावा, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर आता दिवाळीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.