Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! महाविकास आघाडीत फुट; पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय

मोठी बातमी! महाविकास आघाडीत फुट; पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढणाऱ्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधी मोठी फुट पडली आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी तुटली आहे. राऊतांनी माध्यमांशी बोलतांना ही घोषणा केली.

- Advertisement -

यावेळी राऊत म्हणाले की, “मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आता काय होईल ते होईल. एकदा आम्हाला स्वबळ आजमावून पाहायचं आहे.मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तसेच स्वबळाची घोषणा करताना राऊत यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. ते म्हणाले की, “वडेट्टीवार आता बोलत आहेत. ते देखील जागावाटपाच्या बैठकांना उपस्थित राहायचे. शिवसेना राज्यातील एक प्रमुख पक्ष आहे. आमच्यावर टीका होते, पण हरियाणात काँग्रेससोबत कोण होतं? तिकडे ते एकटेच होते. जागावाटपाचा घोळ नव्हता. मग तिकडे त्यांचा पराभव का झाला? हरियाणात काँग्रेससोबत कोण होतं? आम्ही होतो का तिकडे? शिवसेना राज्यात आहे. पण काँग्रेसचा पराभव देशभरात का होतो? पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीरमध्ये शिवसेना होती का? मग तिकडे काँग्रेसचा पराभव का झाला?’ अशी प्रश्नांची सरबत्तीच यावेळी संजय राऊतांनी काँग्रेसवर केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...