Wednesday, May 29, 2024
Homeनगरठाकुर पिंपळगाव येथे धाडसी दरोडा

ठाकुर पिंपळगाव येथे धाडसी दरोडा

बोधेगाव |वार्ताहर|Bodhegav

शेवगाव (Shevgav) तालुक्यांतील ठाकूर पिंपळगाव (Thakur Pimpalgav) येथे रविवारी (दि.13) मध्यरात्री महादेव रणजित खेडकर यांच्या घरावर धाडसी दरोडा (Robbery) टाकून एक लाख ऐंशी हजार रुपये रोख रक्कम तीन लाख आठ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने (Jewelry) असा सुमारें चार लाख अठ्याऐंशी हजार रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

- Advertisement -

कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकुर पिंपळगाव (Thakur Pimpalgav) येथील गावालगतच वस्तीवर राहणार्‍या महादेव रणजित खेडकर हे रात्री घरालगत पत्राच्या शेडमध्ये झोपले होते. रविवारी रात्री सुमारे साडे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी (Robber) घराचा दरवाजा, खिडक्या तोडून घरात प्रवेश केला. एका खोलीत लोखंडी पेटी व घरातील सामानाची उचकापाचक केली. पेटीतील ऐवज हस्तगत केला. त्यानंतर दुसर्‍या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असतां घरात झोपलेल्या महिलेला जाग आली असता त्यांनी आरडा ओरडा केला.

गणवेश, बुटाच्या हिशोबात बिघडले अध्यापनाचे गणित!

लगतचे नागरिक जमा होताच दरोडेखोरांनी (Robber) पलायन केले. घटनेची माहिती नितीन खेडकर यांनी पोलीसांना दिली आहे. त्यानंतर रात्री उशिरा बोधेगाव दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक भास्कर गावंडे, राठोड, धायतडक यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेत कपाटातील व पेटीतील 1 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम, 3 लाख 8 हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने (Jewelry) असा सुमारें 4 लाख 88  हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी (Robber) चोरून पलायन केले. संदिप खेडकर यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात (Shevgav Police Station) तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. कुटुंबातील काही व्यक्ती बाहेरगावी गेले होते. यामुळे पाळत ठेवून ही घटना केली असल्याचे बोलले जात आहे.

कांद्याच्या भावात तेजी कायम‘त्या’ मनीषा विरुद्ध लोणीत आणखी एक गुन्हा दाखल

- Advertisment -

ताज्या बातम्या