Friday, May 3, 2024
Homeनाशिकसारूळमधील कारवाई अपर जिल्हाधिकार्‍यांच्या प्रस्तावानुसारच

सारूळमधील कारवाई अपर जिल्हाधिकार्‍यांच्या प्रस्तावानुसारच

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील अनेक वर्षापासून सारूळ येथील खाणपट्टा (Crusher) संदर्भात अनेक तक्रारी होत्या. नियमबाह्य पद्धतीने याठिकाणी डोंगर पोखरल्याबाबतच्या तक्रारी होत्या. मात्र, यावर अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Additional Collector Dattaprasad Nade) यांनी वेळोवेळी जागांची पाहणी करून अहवाल सादर केले होते. तसेच त्यांनी आपल्याकडे कारवाई करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यानुसारच आज आपण ही कारवाई केली असल्याची स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी गंगाथरण डी (Collector Gangatharan D) यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, अप्पर जिल्हाधिकार्‍यांकडून गौण खनिज व इतर कार्यभार काढून घेतल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी सारूळ येथील खाणपट्ट्यावर (क्रशर) धडक कारवाई केली आहे. सारूळ येथील एकूण 21 खाणपट्टे सील करण्यात येणार आहे. काल मंगळवारी (दि.13) जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याकडील गौणखनिज विभागाचा कार्यभार काढून घेतला होता. दरम्यान, काल जिल्हाधिकारी यांनी केलेल्या कारवाई पुढील मुद्दे समोर आले.

खाण पट्ट्यात किती उत्खनन झाले याची नोंद वहीच नाही. खाणपट्टा परिसरात सिमांकन केलेल नाही. डोंगर, टेकडी कापताना 6 मीटर खोलीच्या नियमांचे पालन केले नाही. खाणपट्ट्यांचा करारनामा करुन घेतला नाही. टेकड्यांचे शिखरे व उतार या ठिकाणांवरुन गौण खनिजांचे उत्खनन करण्यावर बंदी असताना आदेशाला फाट्यावर मारत उत्खनन झाल्याचे आधळून आले. डोंगराळ भागात खाणपट्टा असल्यास तेथे डोंगररांगेच उभे उत्खनन झाल्याचे समोर आले आहे. मायनिंग प्लॅनच्या मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात उत्खनन केल्याबाबत भूमी अभिलेख यांच्याकडून मोजणी करुन मोजणी नकाशा सादर करण्याच्या लेखी सूचना देऊनही तो सादर केलेला नाही.

मी महिनाभरापुर्वीच सर्व खाणींचा तपासणी केली होती. खनिकर्म अधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि सर्कल असे सर्वच अधिकारी कर्मचार्‍यांसह प्रत्यक्ष जागेवर सर्व बाबींना तपासून घेतले. त्यानुसार 21 खाणींना सील करण्याचे आदेश नुकतेच केले आहेत. आता हे सर्व कामकाज जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांच्याकडे घेतल्याने अधिक माहिती त्यांच्याकडून घेता येईल.

दत्तप्रसाद नडे, अपर जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या