नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
गेल्या पाच ते सहा दिवसापासून नाशिकरोड व ग्रामीण भागात सातत्याने वीज पुरवठा (Power Supply) खंडित होत आहे. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून सदरचा वीज पुरवठा केव्हा सुरळीत होणारा? असा सवाल संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) कार्यकर्त्यांनी महावितरणचे अधिकारी डोंगरे यांना घेराव घालून केला. यावेळी डोंगरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले असून याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांना एक निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.
हे देखील वाचा : Sunetra Pawar : राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांनी राज्यसभेसाठी भरला उमेदवारी अर्ज
नाशिकरोड व ग्रामीण भागात गेल्या पाच ते सहा दिवसापासून सातत्याने सहा ते सात तास वीज पुरवठा खंडित होत आहे. या सर्व प्रकारामुळे शेतकरीवर्ग (Farmer)सर्वसामान्य नागरिक व महिलावर्ग हैराण झाला आहे. या प्रकाराची दखल घेऊन शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या येथील मुख्य कार्यालयातील ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता डोंगरे यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. एकलहरे येथील ट्रांसफार्मरमध्ये बिघाड झाला त्याला जबाबदार कोण? संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल का? असा सवालही यावेळी विचारण्यात आला.
हे देखील वाचा : राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळ स्पष्टच बोलले; म्हणाले,”मी नाराज…”
तसेच सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना रोज सहा ते सात तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. नागरिक तुम्हाला सहकार्य करतात मात्र, महावितरण नागरिकांना अजिबात सहकार्य करत नाही.वीज बिल भरण्यासाठी दोन दिवस जरी उशीर झाला तरी नागरिकांना त्रास दिला जातो, यासारख्या अनेक प्रश्नांचा यावेळी भडीमार करण्यात आला. तसेच लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशाराही याप्रसंगी देण्यात आला.
हे देखील वाचा : नाशिकच्या विमानसेवेची भरारी; गत वर्षात अडीच लाख प्रवाशांनी घेतला लाभ
दरम्यान, या सर्व प्रकाराची महावितरणने दखल घेतली असून वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याचे काम सुरू आहे असे आश्वासन यावेळी अभियंता डोंगरे यांनी दिले. मात्र, इतर विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराला त्यांनी बगल दिली. याप्रसंगी संतप्त शिवसैनिकांनी घोषणा देऊन विद्युत भवन परिसर दणाणून टाकला होता. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत दिवे भारती ताजनपुरे, केशव पोरजे, कन्नू ताजणे, योगेश गाडेकर, किरण डहाळे, योगेश भोर, सागर भोर,यांच्यासह आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा