Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमNashik News : रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Nashik News : रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

इगतपुरी रेल्वे स्थानकावरील (Igatpuri Railway Station) प्लॅटफार्म नंबर दोनवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बँक कर्मचाऱ्यावर हल्ला

याबाबत अधिक माहिती अशी की, एक अनोळखी इसम वय अदाजे ३० ते ३५ वर्ष हा इगतपूरी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं ०२ वर कि.मी.नं १३६/१२७ जवळ बेशुध्द असल्याचे कळविल्यावरुन त्या ठिकाणी रेल्वे डॉ. जोश्ना यांनी घटनास्थळी येऊन सदर इसमास तपासून मयत घोषित केले. तसेच या इसमाचे मृत्यूचे नक्की कारण समजुन घेण्यासाठी त्याचा मृतदेह इगतपूरी ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital) पाठविण्यात आला. तेथील डॉक्टरांना कोणत्यातरी दिर्घ आजाराने तो नैसर्गिक रित्या मृत्यू पावला आहे असे सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘त्या’ घरफोडीतील ३९ लाखांचेच दागिने ‘रिकव्हर’

दरम्यान, याबाबत इगतपूरी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनोळखी मयत पुरुष वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असुन अंगाने सडपातळ, रंगाने गहु वर्ण, चेहरा उभट, नाक सरळ, डोक्याचे केस काळे वाढलेले, दाढी काळी बारीक, मिशा बारीक, उंची ५ फुट ४ इंच, चॉकलेटी रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट व अंगात निळ्या रंगाची लोअर पॅन्ट घातलेली असे वर्णन आहे.सदर अनोळखी मयत पुरुषाची ओळख पटली नसून याबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...