Friday, September 20, 2024
Homeक्राईमNashik Crime News : 'त्या' घरफोडीतील ३९ लाखांचेच दागिने 'रिकव्हर'

Nashik Crime News : ‘त्या’ घरफोडीतील ३९ लाखांचेच दागिने ‘रिकव्हर’

मात्र, मुख्य सूत्रधार सापडूनही साडेचार कोटींचे सोने गायबच

नाशिक | प्रतिनिधी| Nashik

- Advertisement -

जुना गंगापूर नाका (Old Gangapur Naka) येथील आयसीआयसीआय होम फायनान्स बँक घरफोडीत (Burglary) पाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने लूटणाऱ्या एका संशयिताला गुजरातमध्ये गुन्हे शाखेच्या पथकाने अटक (Arrested) केली. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली असून केवळ ३९ लाखांचे दागिने ‘रिकव्हर’ करण्यात आले आहेत. तर आखणी एक साथीदार पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : क्रिकेट खेळण्याच्या बॅटने बँक कर्मचाऱ्यावर हल्ला

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ४ मे रोजी मध्यरात्री होम फायनान्स बँकेत घरफोडी झाल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा नोंद आहे. दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही त्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना (Police) यश आलेले नाही. दरम्यान,शहर गुन्हे शाखेची पथके संशयितांच्या मागावर असताना गुजरातमधील हलोलमध्ये सापळा रचण्यात आला. एमएच १२ एचव्ही ०८१८ क्रमांकाच्या कारचा पाठलाग करुन संशयित सतिश चौधरी (२७, रा. महाराणा प्रताप चौक, सिडको) याला पोलिसांनी अटक केली. तर त्याचा साथीदार रतन जाधव निसटला आहे.

हे देखील वाचा : Nashik News : २५ कोटींचे नाट्यगृह बंद अवस्थेत

दरम्यान, याप्रकरणात आतापर्यंत तुकाराम देवराम गोवर्धने (रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) यासह कट रचणारा मुख्य संशयित वैभव लहामगे याला पोलिसांनी अटक केली. वाडीवऱ्हे पोलिसांच्या (Wadivarhe Police) हद्दीत पहिलवान भूषण लहामगे याच्या खून (Murder) प्रकरणातही वैभव लहामगेसह इतर संशयितांचा समावेश आहे. याप्रकरणात दोन्ही गुन्ह्यांचा तपास नाशिक शहर व ग्रामीण पोलिस करीत आहेत. पाच कोटी रुपयांच्या सोने लुटीनंतर बहुतांश सूत्रधार अटकेत असले तरी सोन्याची रिकव्हरी काही टक्केच झाली आहे. त्यामुळे आणखी कोट्यवधी रुपयांचे सोने कुठे आहे, याचा छडा लागलेला नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या