Monday, June 17, 2024
Homeनाशिकशर्यतीच्या मैदानातून बैलगाडा प्रेक्षकांमध्ये घुसला; एकाचा मृत्यू

शर्यतीच्या मैदानातून बैलगाडा प्रेक्षकांमध्ये घुसला; एकाचा मृत्यू

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

आज रविवारी (दि.२६) दुपारी ४.३० वाजेदरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मैदान प्रेक्षक व बैलगाड्यांनी भरून गेले होते. पोपट मुंजे (वय ४५, रा. सारूळ, ता. नाशिक) हे सुद्धा बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले होते. यावेळी एक बैलगाडा या शर्यतीच्या मैदानातून बाहेर उधळला.

बैलगाडा थेट नागरिकांच्या गर्दीतून गेला. त्यामुळे बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आलेले तीन जण जखमी झाले. या घटनेत पोपट मुंजे यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले. मुंजे यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या