शिरपूर Shirpur । प्रतिनिधी
शिरपूर एज्युकेशन सोसायटी (Shirpur Education Society) संचलित, वाघाडी येथील जयश्रीबेन अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलमध्ये (Jayshreeben Amarishbhai Patel CBSE School) दिवाळीची रंगत (Colors of Diwali), आजी आजोबांची संगत (company of grandparents) हा कार्यक्रम उत्साहात (program excitement) साजरा (celebrate) करण्यात आला.
प्रकाशाचा उत्सव दिवाळी आनंदाचा, उत्साहाचा असतो. दिवाळीच्या निमित्ताने शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. सर्वप्रथम लक्ष्मी देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वरूळ येथील आर. सी. पटेल स्कूलच्या प्राचार्या सौ.सपना मराठे उपस्थित होत्या.
प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी रिक्रिएशन गार्डन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत मुलांनी बागेतील झाडे व फुलांची माहिती घेतली. तसेच खेळांचा आनंद लुटला. प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवस आनंदाचा, माणुसकीच्या भेटीचा या उपक्रमातंर्गत शिरपूर येथील अनाथ व मतिमंद मुलांच्या बालगृहाला भेट देण्यात आली. तेथील मुलांसाठी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू व फळे वाटप केले. या उपक्रम व्दारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, कृतज्ञतेची भावना आणि माणुसकी ही मूल्ये त्यांच्यामध्ये रुजावी हा हेतू होता.
त्यानंतर प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांसाठी पणती सजावट, रांगोळी बनवणे, गॅस न वापरता गोड पदार्थ बनवणे तसेच प्रायमरी च्या विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील बनवणे, आकर्षक रांगोळ्या काढणे, तोरण बनवणे, भेटवस्तूची सजावट करणे असे विविध उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाला आजी-आजोबांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती दाखवली.
आजी-आजोबांसाठी विविध रंगारंग नृत्ये, नाटक व खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते. आजी-आजोबांनी नृत्य आणि खेळाचा आनंद घेतला. याप्रसंगी तिसरी व चौथीच्या वर्गातील मुलांनी पियानो वादन सादर करून सर्वांची मने जिंकली. आजी-आजोबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
शाळेच्या प्राचार्या मेघा यांनी सर्व आजी आजोबांनी उस्फूर्तपणे दाखवलेल्या उपस्थितीबद्दल आभार मानले. सूत्रसंचालन शिक्षिका सुचिता जैन व प्रशांत पाटील यांनी केले. आभार प्रशांत सर यांनी मानले. शितल बाबर, सोनाली मामीडवार, अदिती बारी, सिमरन कौर, दिपाली पाटील, नयन जांभळे, सचिन सिसोदिया, इंसान पाडवी, सागर सर, विशाल माळी, शिक्षकेतर कर्मचार्यांनी संयोजन केले.