Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBachchu Kadu : सहकार विभागाचा बच्चू कडूंना दणका; 'या' पदावरून ठरवलं अपात्र,...

Bachchu Kadu : सहकार विभागाचा बच्चू कडूंना दणका; ‘या’ पदावरून ठरवलं अपात्र, अन्नत्याग आंदोलनाचा फटका?

मुंबई | Mumbai 

प्रहारचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू (Former MLA Bachchu Kadu) यांना सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Amravati District Bank) पदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक यांनी न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत बच्चू कडू यांच्याबाबत हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

अमरावती बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड (Haribhau Mohod) यांच्यासह ११ संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना बँकेच्या संचालक पदावरून अपात्र करण्याबाबतची याचिका दाखल केली होती. यामध्ये नाशिक न्यायालयाने कडू यांना एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा ठोठावली असल्याचा दाखला त्यांनी दिला होता. याचाच आधार घेत विभागीय सहनिबंधक यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

YouTube video player

तसेच अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपविधीप्रमाणे शिक्षा सुनावलेल्या व्यक्तीला बँकेच्या (Bank) कोणत्याही पदावर राहता येत नाही. याशिवाय बच्चू कडूंना पुढील पाच वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्यास सहकार विभागाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षे बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवता येणार नाही.

दरम्यान, शेतकरी (Farmer) कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी सात दिवस अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. यानंतर दि. १४ जून रोजी बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर दोन दिवसातच बच्चू कडू यांना सहकार विभागाने मोठा दणका दिला आहे. कडू यांच्यावर ही कारवाई राजकीय द्वेषापोटी करण्यात आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ताज्या बातम्या

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; शरद पवार हे राष्ट्रद्रोही…!

0
मुंबई | Mumbai शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे अनेकदा वादग्रस्त विधानामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांची वादग्रस्त विधाने नेहमीच चर्चेत...