Saturday, September 21, 2024
Homeजळगावडिआरएम याच्या चर्चेनंतर सीआरएमएसचे आंदोलन मागे

डिआरएम याच्या चर्चेनंतर सीआरएमएसचे आंदोलन मागे

भुसावळ (Bhusawal) ( प्रतिनिधी ) –

- Advertisement -

रेल्वे कर्मचार्‍यांच्या (railway employees) विविध मागण्यांसाठी (various demands ) १० जुन पासून सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या (Central Railway Workers Union) वतीने डिआरएम कार्यायासमोर धरणे आंदोलन (movement) करण्यात येत आहे. सरकारच्या वतीने कामगारांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास चक्का जाम करण्याचा ईशारा युनीयनच्या वतीने देण्यात आली होती. याबाबत डिआरएम (DRM) यांनी शिष्ठमंडळाशी चर्चा करुन आश्‍वासन दिल्याने धरणे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

सीआरएमएसच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन (Indefinite movement) १० जूनपासून मंडळ अध्यक्ष व्ही. के. समाधिया यांच्या नेतृत्वात आंदोलनाचे सुर करण्यात आले होते. या आंदोलनात मंडळ सचिव एस. बी. पाटील, मंडळ सचिव वर्कशॉप किशोर कोलते, मंडळ समन्वयक एस. के. दुबे, मंडल संगठक पी. के. रायकवार, महिला मंडळ अध्यक्ष कुंदलता थूल यांनी भारत सरकारच्या (Government of India’s) कामगार विरोधी धोरणांचा (anti-worker policies) तीव्र निषेध केला, सरकार विरुद्ध लढण्यासाठी कामगारांनी एक होऊन सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या आंदोलनात सहभागी होण्याची अपील केली. भारत सरकारने कामगारांच्या मांगन्या मान्य न केल्या रेल्वेचा चक्का जाम (Railway wheel jam) करण्याचा इशारा धरणे आंदोलनातून देणञयात आला होता. धरणे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाखा सचिव, शाखा अध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

आज मोर्चा –

दरम्यान, १५ रोजी सायंकाळी ५ वाजता कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी (various demands ) डिआरएम कार्यालयावर मोर्चाचे आयोजन (Morcha organized) करण्यात आले आहे. कामगारांच्या मागण्यांमध्ये, मनमानी पद्धतीने पदांचे अंदाधुंद आत्मसमर्पण थांबवावे, गैर-सुरक्षा श्रेणीतील ५० टक्के रिक्त जागा आत्मसमर्पण करण्याचा तसेच दरवर्षी २ टक्के पद आत्मसमर्पण करण्याचा आदेश मागे घेणे.

एनपीएस बंद करून जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी.एसपीएडी केसस मध्ये रेलवे सेवेतून कमी केलेल्या कर्मचार्‍यांना परत नौकरीत घेणे. आणि एसपीएडीच्या सर्व प्रकरणांचा न्याय्यपणे आढावा घेण्यात यावा. नाईट ड्युटी भत्त्याची कमाल मर्यादा तात्काळ हटवा. १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ पर्यंतचा डिए. तत्काल देण्यात यावा आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या