Wednesday, April 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजचैत्रोत्सवाला सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी

चैत्रोत्सवाला सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी

नांदुरी / सप्तशृंगीगड वार्ताहर

चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. नंंदुरबार, नवापूर, धुळे, जळगाव या खान्देश प्रांंतातून अनेक पालख्या, दिंड्या, भाविक सप्तशृंगीगडावर पोहोचू लागले आहेत. त्यामुळे सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवात चैतन्याचे वातावरण आहे. आज श्री भगवतीस गुलाबी रंगाचे भरजरी महावस्त्र नेसवण्यात आले. दिवसभरात श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी विश्वस्त संस्थेच्या अन्नपूर्णा प्रसादालयातही भाविकांची गर्दी बघायला मिळाली.
.
सप्तशृंगीगडावर वर्षभरात दोन महत्त्वाचे उत्सव पार पडतात. एक शारदीय नवरात्रोत्सव अन् दुसरा चैत्रोत्सव. या दोन्ही उत्सवात गडावर येणार्‍या भाविकांचा उत्साह अनोखा असतो. मात्र खासकरून भक्तीचा आणि श्रद्धेचा मिलाफ चैत्रोत्सवातच बघायला मिळतो. चैत्रोत्सव म्हटला की, नंदुरबार, नवापूर, धुळे, जळगाव हून अनेक पालख्या, दिंड्या, भाविका सप्तशृंगीगडावर दर्शनासाठी रिघ लावतात . पायी प्रवास करूनही मोठा उत्साह या भाविकांच्या चेहर्‍यावर बघायला मिळत आहे. यातील बर्‍याच पालखी, दिंड्यांना 30-40 वर्षांची परंपरा आहे. मालेगाव, सटाणा, देवळा, वसाका, कळवण परिसरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुललेले दिसत आहेत.

- Advertisement -

आजची देवीची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त अ‍ॅड. दीपक पाटोदकर व नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सपत्नीक परिवारासमवेत केली. यावेळी स्वामी संविदानंद सरस्वती, प्रकाश पाटोदकर, आश्विन शेटे, कमलाकर गोडसे उपस्थित होते. यादरम्यान विश्वस्त संस्थेच्या कार्यालयातून देवीच्या अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, सहा. व्यवस्थापक तथा कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सप्तशृंगीगड ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप बेनके आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Temperature : खान्देशात उष्णतेची लाट ; भुसावळात पारा ४५.८ पार

0
जळगाव । jalgaonगेल्या दोन दिवसांपासून खान्देशात उष्णतेची लाट निर्माण झाली असून भुसावळचा पारा 45.8 पार गेला आहे. तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अन्य शहरामध्येही...