नाशिक | वैभव कातकाडे | Nashik
जिल्ह्यात गेल्यावर्षी 58 हजार कामगार रोहयोच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र उन्हाची तीव्रता (intensity of the sun) वाढत गेल्याने आता ही संख्या कमी कमी होत आहे.
यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात आता अवघे 16 हजार कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी करोनाचे (corona) सावट सर्वांवर होते; तरीदेखील ही संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र, या वर्षी अतिशय कमी कामगार उपलब्ध आहेत. आता उन्हाळा (summer) ओसरू लागल्यावर ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची (Maharashtra Employment Guarantee Act) अंमलबजावणी 1977 पासून महाराष्ट्रात (mahrashtra) सुरु झाली. या योजनांना राज्य शासनाच्या (state government) निधीतून (fund) अर्थसहाय्य केले जात होते. 2005 मध्ये केंद्र शासनाने (central government) संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (National Rural Employment Guarantee Act) लागू केला. 2009 मध्ये याचे नामकरण करून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (Mahatma Gandhi National Rural Employment) हमी कायदा असे केले.
सद्य:स्थितीत राज्यात या कायद्यांतर्गत प्रमुख दोन योजना सुरु आहेत त्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेंतर्गत केंद्र शासन 100 दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व 100 दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रति कुटुंब 100 दिवसावरील प्रत्येक मजुराच्या, मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. आणि वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्वावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबविण्यात येतात. जवाहर किंवा धडक सिंचन विहिर योजना आणि रोहयोंतर्गत फळबाग लागवड योजना यांचा समावेश होत आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा ही मागेल त्याला काम या धर्तीवरील योजना आहे. करोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांचे रोजगार बुडाले होते. त्यामुळे मजूर आपापल्या गावी परतले होते. अशा मजुरांना गावातच रोजगार मिळावा यासाठी शासनाने मजुरांच्या हाताला काम दिले. त्यामुळे या काळात मजुरांची संख्या 55 हजारांपर्यंत पोहचली होती. यंदा 16 हजार मजूर रोजगार हमीवर काम करीत आहे. मे महिन्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रोपवाटिका, वृक्ष लागवड, विहीर पुनर्भरण, गाळ काढणे, शौचालय बांधणे, घरकूल, दगडी बांध, फळबाग लागवड, शेततळे यासह 32 प्रकारची कामे जिल्ह्यात सुरू आहेत.
तालुक्यानुसार कामगार संख्या
दिंडोरी 128, नाशिक 175, सिन्नर 184, निफाड 254, त्र्यंबकेश्वर 570, देवळा 611, सुरगाणा 622, चांदवड 1016, मालेगाव 1136, कळवण 1165, इगतपुरी 1281, नांदगाव 1315, पेठ 2038, येवला 2229, बागलाण 2735