Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रPolitical Crisis : महायुतीतील राजकीय धुसफूस चव्हाट्यावर

Political Crisis : महायुतीतील राजकीय धुसफूस चव्हाट्यावर

चव्हाण-कदम यांच्यात शाब्दिक युद्ध

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) एकजुटीने आणि एकदिलाने सामोरे जाण्याची भाषा करणाऱ्या महायुतीतील राजकीय धुसफूस सोमवारी चव्हाट्यावर आली. भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांना कुचकामी ठरवत त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली. कदम यांच्या या टीकेचा चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे रायगड जिल्ह्यातील आमदार महेंद्र थोरवे यांनी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर विश्वासघातकीपणाचा आरोप केला. ऐन  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पातळीवरही मतभेद जाहीरपणे समोर आल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

हे देखील वाचा : “…तर त्याक्षणी मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”; देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

माजी मंत्री रामदास कदम यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai Goa Highway) रवींद्र चव्हाण यांना लक्ष्य केले. चव्हाण यांची निव्वळ चमकेगिरी सुरु आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते, पुलांची कामे झालेली नाहीत. रस्ते नाहीत, रस्त्यात खड्डे आहेत. असे असताना पाहणी दौरा कशासाठी? असा सवाल करत कदम यांनी रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख कुचकामी मंत्री असा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे कदम म्हणाले.

हे देखील वाचा : “ए मिटकरी, तुझी पात्रता…”; भाजप नेत्याची अमोल मिटकरींवर शेलक्या शब्दात टीका

रामदास कदम यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रामदास कदम हे वारंवार अशा पद्धतीने टोकाचं बोलतात. त्यामुळे आमची मनंही दुखावली जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत. त्यांच्या विधानाला उत्तरादाखल बोलताना आम्हालाही ५० गोष्टी बोलता येतील. पण जे मोठे नेते आहेत, त्यांनी काहीतरी पथ्य पाळलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला वारंवार अशा प्रकारचं बोलणं आम्हाला मान्य नाही, असे फडणवीस यांनी ठणकावले.  याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलेन, असेही त्यांनी सांगितले. तर रवींद्र चव्हाण यांनीही कदम यांना जशास तसे उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कदम हे कित्येक वर्ष मंत्री होते. त्यांनी काय काम केले?  गेल्या ३५ ते ४० वर्षात केलेले एक काम करून दाखवा. त्यांनी कोकणासाठी काहीच केलेले नाही. ते उद्धवजी होते त्यांनी त्यांना फार महत्व दिले. आता कोण महत्व देणारे राहिले नाही. त्यामुळे आता सर्व विसरून जा, असे चव्हाण यांनी सुनावले.

हे देखील वाचा : एकनाथ शिंदे कर्ण, फडणवीस अर्जून तर शरद पवार शकुनी मामा; कोणत्या नेत्याने दिली उपमा..

दरम्यान, खोपोलीतील एका कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वासघातकी असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष आहे हे मी जाहीरपणे सांगतो, असे विधान थोरवे यांनी केले. यावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी थोरवे हे अदखलपात्र आहेत, असे सांगितले. त्यांचा विधानसभा मतदारसंघ हा रायगड लोकसभा मतदारसंघात येत नाही. ते दखल घेण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यांनी केलेल्या आरोपाला आमचे स्थानिक नेते उत्तर देतील, असे तटकरे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या