Sunday, June 1, 2025
Homeनाशिक'वॉटरग्रेस' सेवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

‘वॉटरग्रेस’ सेवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक महापालिकेतील (NMC )शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या ‘वॉटरग्रेस’ प्रोडक्ट्स कंपनीतील(Watergrace Products Company) स्वेच्छेने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या युनियनचे सदस्यत्व स्वीकारलेल्या जवळपास 650 कंत्राटी कामगारांना ठेकेदारांनी बेकायदेशीररीत्या काढल्यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौर्‍या दरम्यान शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह मनसेना कामगार सेना पदाधिकार्‍यांनी ‘वॉटरग्रेस’ कामगारांचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला होता.दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, सरचिटणीस संतोष धुरी यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत या कामगारांच्या वतीने त्यांना निवेदन देत याबाबत जातीने लक्ष घालण्याचे साकडे घातले.

करोना काळातील आपल्या जीवाची बाजी लावून स्वच्छता करणार्‍या या करोना योद्यांना बेकायदेशीररीत्या कामावरून कमी केल्याने शेकडो कामगारांच्या घरी चुली पेटत नसून या गोरगरीब कामगारांसह त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कामगारांना न्याय द्या, अशी मागणी करण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Flash Floods : ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाचे थैमान; २५ हून अधिक जणांचा...

0
नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था  ईशान्य भारतातील (Northeastern States) आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार...