Friday, May 3, 2024
Homeजळगावदूध संघासाठी 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

दूध संघासाठी 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Jalgaon District Cooperative Milk Producers Association) 19 जागांसाठी आज सात केंद्रांवर 100 टक्के मतदान (vote) झाले. 19 जागांसाठी 39 उमेदवार (39 candidates) आपले नशीब आजमावत असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद (closed ballot box) झाले आहे. दरम्यान उद्या दि. 11 रोजी जळगाव येथे सत्यवल्लभ सभागृहात होणार्‍या मतमोजणीअंती (matmojani) या निवडणुकीचा फैसला होणार आहे.

- Advertisement -

Photos # दूध संघासाठी अडीच लाखापर्यंत पोहोचला फुलीचा भाव

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक यंदा चांगलीच गाजली. यावेळेच्या निवडणुकीत भाजपा- शिंदे गट प्रणित शेतकरी विकास व महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनल असा सामना रंगला. भाजपा- शिंदे गटाच्या पॅनलची धुरा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण तर सहकार पॅनलचे नेतृत्व राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. महिनभरापासून आमदार मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. तसेच मतदारांच्या मेळाव्यांमधूनही एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेण्यात आले. या निवडणुकीसाठी 441 मतदारांचे ठराव होते. या सर्व मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजाविला.

मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर राष्ट्रवादीचे निषेध आंदोलनवीजचोरांनी कारवाईत अडथळे आणल्यास गुन्हे दाखल करु !

लक्ष्मीदर्शनाची मोठी चर्चा

यावेळेच्या निवडणुकीत मतदार हा खरोखरच राजा ठरला. प्रत्येक मतासाठी लाखो रूपयांच्या लक्ष्मीदर्शनाची मोठी चर्चा जिल्हाभरात रंगली होती. मतदारांपर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधून मतदानाविषयी मनधरणी केल्याचे चित्रही दिसून आले.

VISUAL STORY: अशी होती एक ‘लावणीसम्राज्ञी’Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळ

दूध संघावर खडसे की चव्हाण?

जिल्हा दूध संघावर गेल्या सात वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व राहिले आहे. यंदा मात्र भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांना कडवे आव्हान दिले. राज्यातील सत्तेचीही या निवडणुकीत भाजपाला मोठी मदत झाली. दूध संघासाठी 100 टक्के मतदान झाल्याने दूध संघावर आ. खडसे की आ. चव्हाण? याचा फैसला रविवारी मतमोजणी अंती होणार आहे. दरम्यान शेतकरी विकास आणि सहकार पॅनल या दोघांनीही विजयाचे दावे केले आहे.

Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

- Advertisment -

ताज्या बातम्या