Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशआजपासून 'ऑपरेशन गंगा'चा अंतिम टप्पा; भारतीय दूतावासाने केले 'हे' आवाहन

आजपासून ‘ऑपरेशन गंगा’चा अंतिम टप्पा; भारतीय दूतावासाने केले ‘हे’ आवाहन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

रशिया आणि युक्रेनमध्ये काही दिवसांपासून युद्ध (Russia-Ukraine War) सुरु आहे. या युद्धात आतापर्यंत प्रचंड मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. युक्रेनच्या सीमेवर अनेक परदेशी नागरिक आणि विद्यार्थी आहे. यात भारतीयांची (Indian) संख्यादेखील मोठी आहे.

- Advertisement -

भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने (Government) ऑपरेशन गंगा (Operation Ganga) मोहीम सुरु केली होती. या मोहिमेद्वारे हजारो भारतीयांना आतापर्यंत मायदेशात आणण्यात आले आहे.

आजपासून ऑपरेशन गंगा मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याला सुरु झाली आहे. यामुळे भारतीय दुतावासाने युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण आवाहन केले आहे.

भारतीय दुतावासाने ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी हंगेरीया सिटी सेंटर, राकोझी युटी ९० आणि बुडापेस्ट या शहरांमध्ये लवकरात लवकर पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या