Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगट, गणाची अंतिम प्रभाग रचना उद्या होणार सादर

गट, गणाची अंतिम प्रभाग रचना उद्या होणार सादर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या गट-गण प्रारूप आराखड्यावर प्राप्त झालेल्या हरकतींवर विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे झालेल्या सुनावणीनंतर आयुक्त गेडाम यांनी काही दुरुस्त्या, नवीन बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बदल करत जिल्हा निवडणूक शाखेने गट व गणाची प्रभाग रचना अंतिम केली असून ती उद्या सोमवारी (दि.१८) विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार दि. २२ ऑगस्टपर्यंत विभागीय आयुक्त यांच्याकडून यासमान्यता मिळाल्यानंतर ती रचना अंतिम राहणार आहे.

YouTube video player

विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांच्याकडे दि.७ ऑगस्टला सुनावणी झाली आहे. यावेळी हरकत घेणाऱ्या हरकतदारांना सुनावणीच्यावेळी उपस्थित राहणे बंधनकारक केलेले होते. त्यात अनुसुस्थित राहिलेल्या अर्जदारांच्या हरकती फेटाळण्यात आल्या होत्या. प्राप्त सर्व हरकतींवर सुनावणी होऊन आयुक्त गेडाम यांनी काही दुरुस्त्या, नवीन बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बदल करत जिल्हा निवडणूक शाखेने गट व गणांची प्रभाग रचना अंतिम केली असून ती उद्या सोमवारी (दि.१८) विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.

जिल्हा परीषद, पंचायत समितीसाठी नव्याने गट, गण आराखडा जाहीर करण्यात आल्यानंतर निर्धारित कालावधीत जिल्ह्यातून एकूण ६४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. सर्वाधिक हरकती निफाड तालुयातुन १९, त्याखालोखाल नाशिक तालुयात १३, मालेगाव १३, चांदवड ५, देवळा ३, नांदगाव ३,सिन्नर व सुरगाणा येथे प्रत्येकी २, तर त्र्यंबक, येवला, पेठ,आणि कळवण येथून प्रत्येकी एक हरकत नोंदवण्यात आली. इगतपुरी, दिंडोरी आणि बागलाण या तालुयांतून कोणतीही हरकत प्राप्त झालेली नव्हती.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या गट-गण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले आहे. चांदवड, सुरगाणा आणि मालेगाव या तालुयांमध्ये प्रत्येकी एक गट वाढल्याने त्यानुसार नकाशे तयार करण्यात आले, तर तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद याठिकाणी याद्या लावून हरकती मागविण्यात आल्या होत्या. तहसील कार्यालयांमध्ये प्राप्त हरकती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्यानंतर त्या हरकती अभिप्रायासह विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आल्या आहेत. गट-गण रचनेचे अंतिम प्रारूप दि. २२ ऑगस्टपूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर केले जाणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘नियोजन’ च्या 756 कोटी 43 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 756 कोटी 43 लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे....