Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपतसंस्थांचे कार्य ईश्वरीय : चांडक

पतसंस्थांचे कार्य ईश्वरीय : चांडक

सतरा संस्थांना ‘आदर्श पतसंस्था पुरस्कार’ प्रदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik
पतसंस्थांचे कार्य ईश्वरीय असून, आपण ईश्वराचेच देवदूत आहात. समाजातील उपेक्षित गरजू लोकांना मदत कार्य अविरतपणे सुरू ठेवावे तसेच लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये याची दक्षता सहकारी संस्थांनी घ्यावी असे प्रतिपादन बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑफ सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.

जिल्ह्यातील आदर्श पतसंस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढून त्यांच्या कार्याला स्फूर्ती मिळावी या उद्देशाने दैनिक ‘देशदूत’च्या वतीने व नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सह. फेडरेशन मर्यादित., नाशिक यांच्या सहकार्याने आदर्श पतसंस्था पुरस्कार 2024फ हा शानदार सोहळा आज नाशिक-पुणे रोड येथील नासिक्लब या ठिकाणी पार पडला. याप्रसंगी चांडक बोलत होते.

- Advertisement -

यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फयाज मुलानी, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सह. फेडरेशन मर्यादित., नाशिकचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, कार्याध्यक्ष नारायणशेठ वाजे, ‘देशदूत’ वृत्तपत्र समूहाचे संचालक विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध 17 पतसंस्थांना सन्मानित करण्यात आले.


राधेश्याम चांडक म्हणाले की, समाजामध्ये अनेक उपेक्षित राहतात त्यांना प्रवाहात आणणे व त्यांना मदत करणे यासाठी सहकाराची स्थापना झाली. लवकरच नीट परीक्षांचा निकाल जाहीर होणार आहे. या परीक्षेत अनेक गरीब विद्यार्थी देखील चमकदार कामगिरी करतात या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक कर्ज द्यावे असे चांडक म्हणाले.

बुलढाणा अर्बन कडून कर्ज घेऊन साडेसहाशे विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन, समाजात वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यापैकी दोन डॉक्टर नाशिक शहरात देखील सेवा देत असल्याचा उल्लेख राधेश्याम चांडक यांनी केला. तत्पूर्वी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी प्रास्ताविकात मनोगत व्यक्त करताना सुरुवातीला सहकार महर्षी भास्करराव कोठावदे यांना पुण्यस्मरण दिनानिमित्त, ‘देशदूत’तर्फे अभिवादन केले. त्या म्हणाल्या, देशदूत कायमच चळवळीसोबत उभे राहिलेले दैनिक आहे. समाजात चांगले कार्य करणार्‍या संस्थांच्या मागे उभे राहण्याचे काम ‘देशदूत’ नेहमी करतो.

नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचे सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था फयाज मुलानी, सप्तशृंगी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंतच्या अध्यक्ष मंदाकिनी बनकर, कै. देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितचे उपाध्यक्ष पंकज धारणे, श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंचवटीचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.


याप्रसंगी विजेत्या पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक, सदस्य, कुटुंबिय, नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, राजेश शेळके, सचिन गीते, गणेश नाफडे, बचत गटाच्या अश्विनी बोरस्ते, कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष अंजली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पुरोहित, रेणुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष शशीताई अहिरे, मलाबार गोल्ड अँड डायमंडचे स्टोअर इन्चार्ज रोहित सोनार, ग्रामीण जाहिरात व्यवस्थापक सचिन कापडणी, कॉर्पोरेट व्यवस्थापक संदीप राऊत, व्यवस्थापक मिलिंद वैद्य, मार्केटिंग ऑफिसर समीर पराशरे, भगवान जाधव, आनंद कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विलास पाटील, संतोष गिरी, संदीप जगताप, निलेश दायमा, समीर कवी, प्रशांत अहिरे आदींनी परिश्रम घेतले.


धान्य साठवणूक क्षमता वाढवावीराधेशाम चांडक
धान्य साठवण योजनेअंतर्गत 700 लाख टन धान्य साठवण्याची क्षमता विकसित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची धान्य साठवणूक क्षमता 23 लाख मेट्रिक टन आहे. शेजारील मध्य प्रदेश राज्याची साठवण क्षमता 1.67 लाख मेट्रिक टन एवढी आहे. बुलडाणा अर्बनची धान्य साठवण क्षमता 9 लाख मेट्रिक टन आहे. देशात दरवर्षी धान्य साठवणुकीअभावी 50 हजार कोटीपेक्षा जास्त धान्य नष्ट होते. देशात नष्ट होणार्‍या अन्नधान्यात जगातील इतर 4 ते 5 देशांची वर्षभर धान्य तरतूद होऊ शकते. त्यामुळे धान्य साठवण क्षमता वाढावी असे मत चांडक यांनी व्यक्त केले. अनेक समारंभांमधील उष्ट्या अन्नामुळे देशात दरवर्षी एक लाख बारा कोटींचे धान्य नष्ट होते. हे धान्य वाया जाऊ नये म्हणून प्रत्येकाने उष्टे अन्न न टाकण्याचा संकल्प करावा असे आवाहन देखील राधेशाम चांडक यांनी केले.

या पतसंस्थांचा झाला सन्मान

1.श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, डुबेरे ता. सिन्नर
2.श्री गजानन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित. कळवण.
3.श्री. संत सावता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळगाव बसवंत.
4.दि सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक.

5.कै. देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. त्र्यंबकेश्वर, नाशिक
6.श्री. गजानन महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, ओझर (मिग)
7.कुबेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कसबे सुकेणे.
8.निर्मिती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नाशिक
9.सहकार महर्षी त्र्यंबकराव घुगे (गुरुजी) भाग्यश्री सहकारी पतसंस्था मर्यादित, निफाड.
10.एस.एस.के. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नायगाव ता. सिन्नर
11.लोकनेते कन्हैयालालजी नहार नागरी सह. पतसंस्था मर्या. बोलठाण ता. नांदगाव
12.श्री. इच्छामणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,कळवण.
13.कस्तुरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिन्नर
14.साईलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, पाथरे ता. सिन्नर
15.सप्तशृंगी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळगाव बसवंत
16.श्री हरिओम अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नाशिक

17.श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंचवटी, नाशिक

सहकारात, खर्‍या अर्थाने राजकारण व समाजकारणात बदलाव आणण्याची ताकद आहे. मविना सहकार नाही उद्धारफ यामुळेच आ. दिलीपराव बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आमच्या सप्तशृंगी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळगाव बसवंत. या संस्थेने अल्पवधीतच गरुडझेप घेतली. परंतू फक्त नफा कमावणे यासाठी संस्थेचा कारभार न करता आपण समाजाचे देणे लागतो, या लोकभावनेतून आम्ही अनेक सामाजिक कार्यात देखील सक्रिय सहभाग घेतला. – मंदाकिनी बनकर, अध्यक्ष, सप्तशृंगी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पिंपळगाव बसवंत

दैनिक देशदूत ने केलेल्या सन्मानाने भविष्यात आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन मिळणार आहे, त्यामुळे ‘देशदूत’चे मनस्वी धन्यवाद. अनेक समाज उपयोगी योजना व सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जात आहेत याचा सार्थ अभिमान आहे.-पंकज धारणे, उपाध्यक्ष, कै. देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्था मर्या. त्र्यंबकेश्वर

संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात शिक्षणाची सोय कमी असल्याने डिजिटल अंगणवाडी स्थापन केली असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक गरीब कुटुंबातील पाल्यांना संस्थेने दत्तक घेतले आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च संस्थेतर्फे सुरू आहे. अनेक सामाजिक उपक्रम संस्थेने राबविले आहेत. ‘देशदूत’तर्फे झालेल्या सन्मानामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, त्यामुळे हे कार्य आम्ही अविरतपणे सुरू ठेवू.
-बापूसाहेब गायकवाड, अध्यक्ष, श्री गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पंचवटी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या