Friday, January 9, 2026
Homeभविष्यवेधभविष्यवेध : स्वप्नांवरून जाणा भविष्य

भविष्यवेध : स्वप्नांवरून जाणा भविष्य

प्रत्येकालाच कधी ना कधी स्वप्न पडत असतेच. अनेकवेळा ते चांगले असते किंवा वाईट असते. चांगली स्वप्ने आपल्याला आनंदित करतात अर्थात वाईट स्वप्ने आपला दिवस खराब करण्यासाठी पुरेशी असतात. पण, या स्वप्नांना खरंच काही अर्थ असतो का. आपल्या पुढील आयुष्याबाबत या स्वप्नांमध्ये काही दडलं असते का? या स्वप्नांचा अर्थ आपल्याला कळाला तर भविष्यात घडणार्‍या घटनांची आपल्याला पूर्वकल्पना येऊ शकते का? या आणि अशा अनेक प्रश्नांचे काही प्रमाणात उत्तर हो असेच आहे. कारण स्वप्न आणि नेमक्या भविष्यात त्याच्याशी साधर्म्य असणार्‍या घटना माणसाच्या आयुष्यात घडत असतात.

  • तुम्हालाही जाणून घ्यायचंय तुम्हाला पडलेल्या स्वप्नांचा अर्थ.. मग हे वाचाच…
  • स्वप्ना मध्ये जर एखाद्या पुरुषाला स्वत: उंच भिंतीवर बसलेले पाहिल्यास सुखसंपत्ती प्राप्त होते.
  • एखाद्या पुरुषाला तो स्वत: वयापेक्षा मोठे झालेले दिसले तर त्याला मानसम्मान प्राप्त होतो.
  • स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला गाय, बैल, पक्षी, हत्ती यांच्यावर चढून स्वत: जर समुद्र पार करताना पाहिल्यास त्याला जास्त मोठा अधिकार प्राप्त होण्याचा योग असतो.
  • पुरुषाला घर जळताना दिसले, तर त्याला अधिकार प्राप्त होण्याचा योग बनतो.
  • एखाद्या पुरुषाला कानात कुंडल, डोक्यावर मुकुट व गळ्यात मोत्याची माळ घातलेली दिसल्यास त्याला उच्चाधिकार व त्यातून लाभ प्राप्त होतात.
  • शत्रूंना पराजीत करतानाचे स्वप्न पुरुषाला पडल्यास त्याला बढती मिळते.
  • कमळाच्या पानावर बसून स्वत:ला खीर खाताना पाहिले तर त्याला राजकीय पद, मंत्रिपद मिळू शकते.
  • स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला टक्कल पडलेले दिसले तर त्याला अमूल्य धनप्राप्ती होते.
  • स्वप्नामध्ये जर एखाद्या पुरुषाला कुंभार मडके बनवताना दिसल्यास त्याचे स्वत:चे दुख: लवकरच दूर होणार व धनलाभ होणार असे समजावे.
  • स्वप्नात रडणारे बालक दिसणे आजारपण व निराशा यांची सूचना देते.
  • एखाद्या स्त्रीला जर स्वप्नात स्वत:ला टक्कल पडलेले दिसले तर गरिबीचा सामना करण्याचे योग संभवतात.
  • एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वत:स दुर्घटना घडताना दिसली तर लवकरच आजारपण संभवते.
  • एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वत: आरसे फोडत असल्याचे दिसल्यास त्याच्या परिवारात कोणावर तरी मृत्यूसम संकट येते.
  • एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वत:ची नाव तुफानी वादळात फसलेली दिसल्यास येणारा काळ पूर्ण असण्याची ही सूचना समजावी.
  • खाद्याला स्वप्नामध्ये जर स्वत: कडू औषध घेताना पाहिल्यास जीवनात अनेक प्रकारच्या समस्या येण्याचे संकेत आहेत.
  • एखाद्याला स्वप्नामध्ये जर मुंग्याना स्वत: मारताना पाहिल्यास व्यापार नाश संभवतो.
  • एखाद्याला स्वप्नामध्ये जर स्वत: प्रवासासाठी वाहनाद्वारे जाण्याची तयारी करताना दिसल्यास त्याला योजलेला प्रवास रद्द केलेलाच बरा. कारण अपघात भय दिसते.

ताज्या बातम्या

कोंबडीवर ताव मारण्याच्या नादात बिबट्या जेरबंद

0
सोनेवाडी (वार्ताहर) कोपरगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर अनेक ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते.वन विभागाने हिंगणी परिसरातही पिंजरा लावला होता. काल शुक्रवारी रात्री...