नाशिक |
नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून आज नाशिक मध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा सुरु आहे. दरम्यान आजच्या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षा नंतर एकत्र आल्याने नाशकात दोघेही निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे व उद्धव ठाकरे काय भाष्य करतात या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. नाशिकमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवार फोडा फोडीवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी बिनविरोध निवडणुकीवरून देखील निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही मागील कुंभमेळ्याच्या काळात एकही झाड न तोडता कुंभमेळा पूर्णत्वास नेला होता. कुंभमेळा होऊन देखील आम्ही नाशिक महानगरपालिका आम्ही कर्जमुक्त केली होती. नाशिकला दत्तक घेणार्यांनी दिलेल्या घोषणा ठरल्या प्रत्यक्षात मात्र काही झाले नाही नाशिक करांना नुसत्याच घोषणा पदरी आल्या, न आयटी पार्क झालेत, न मेट्रो प्रकल्प झाला.
आज अनेक वर्ष निवडणुका रखडल्या, का रखडल्या? याची कारणं कुणालाही देता येणार नाही, सांगता येणार नाही, कारणं कळलीच नाही. इतकी वर्ष निवडणुकीला का लागल्या? कशासाठी लागल्या? चार वर्षापूर्वी मुदत संपल्यावरही निवडणूक होत नव्हत्या. का होत नव्हत्या याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे.
भीती घालायची, दहशत करायची आणि अशा वातावरणात निवडणुका घेता. नाशिकमध्येही भाजप तुमच्याकडे माणसं होती ना? मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.





