Saturday, May 18, 2024
Homeधुळेबस डेपोत आढळलेली बालिका पालकांच्या स्वाधीन

बस डेपोत आढळलेली बालिका पालकांच्या स्वाधीन

दोंडाईचा dondaicha । श.प्र.

येथील बस डेपो परिसरात (bus depot) आढळून (found) आलेल्या पाच वर्षीय बालिकेच्या (girl) पालकांचा (parents) पोलिसांनी 36 तासाच्या आतच शोध घेतला. बालिकेला त्यांच्या ताब्यात (custody) दिले. याबद्दल दोंडाईचा पोलिसांसह महिला वाहकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisement -

दोंडाईचा बस डेपोमध्ये दोन दिवसांपुर्वी एक चार ते पाच वर्षाची बालिका मिळुन आली. ती कल्याण जाणार्‍या बसमधुन उतरली होती. ही दोंडाईचा आगाराचे वाहन निरीक्षक देवेद्र गिरासे यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ दोंडाईचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्रीराम पवार यांना माहिती दिली. त्यावरुन उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलीस अंमलदार गोपाल सोनार, पोकाँ प्रशांत नाथजोगी, चालक नरेश मंगळे यांनी दोंडाईचा बस डेपोत दाखल होत बालिकेला विचारपुस केली. नाव विचारले असता तीने तिचे नाव अंजली जगदिश असे सांगितले. त्या पलीकडे ती काहीही सांगत नव्हती. त्या ठिकाणी महिला वाहक कल्पना पारधी या हजर होत्या. त्यांनी बालिकेला विश्वासात घेत विचारपुस केली. तसेच तिचे आई-वडील मिळत नाही तोपावेतो तीचा सांभाळ करण्यास त्यांनी स्वःखुशीने तयारी दाखविली. तर पोसई दिनेश मोरे व पथकाने बालिकेच्या आई वडीलांचा शोध सुरू केला. काल दि.7 रोजी बालिका ही वडील जिग्या गारचीलाल पावरा (रा. जोयदा ता. शिरपुर) यांची मुलगी असल्याचे कळाले. त्यांना दोंडाईचा पोलीस ठाणे येथे आणुन प्रभारी अधिकारी पवार यांच्या समक्ष हजर केले. बलिका ही त्याची मुलगी असल्याचे आधारकार्ड पाहुन खात्री करण्यात आली. त्यानंतर बालिका व वाहक कल्पना पारधी यांना पोलीस ठाण्यात बोलावुन बालिकेला गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या समक्ष वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.

बालिकेचा दोन दिवस महिला वाहक कल्पना पारधी यांनी सांभाळ केला. तर वाहन निरिक्षक गिरासे यांनी देखील मदत केली. प्रभारी अधिकारी श्री.पवार यांच्या मार्गदशनात पोसई दिनेश मोरे व पथकाने 36 तासात बालिकेच्या वडीलांचा शोध घेवुन त्याच्या ताब्यात दिले. या कामगिरीचे दोंडाईचा पोलिसांसह दोंडाईचा आगारातील महिला वाहकाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या