Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी उपोषणस्थळाकडे रवाना

सरकारचे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी उपोषणस्थळाकडे रवाना

शिष्टमंडळात भुजबळ-मुंडेंसह १२ जणांचा समावेश

जालना | Jalna

गेल्या दहा दिवसांपासून जालन्यातील (Jalna) वडगोद्री येथे आमरण उपोषणास बसलेले ओबीसी उपोषणकर्ते (OBC Reservation) लक्ष्मण हाके(Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ थोड्याच वेळापूर्वी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. त्यानंतर आता हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेण्यासाठी वडगोद्रीकडे रवाना झाले असून ते त्याठिकाणी उपोषणकर्ते हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. त्यामुळे या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर हाके आणि वाघमारे उपोषण मागे घेतात का याची उत्सुकता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Vegetables Rate : भाजीपाल्याची आवक घटली; दर वाढले

या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) धनंजय मुंडे, उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे खासदार संदीपान भुमरे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, समीर भुजबळ, शब्बीर अन्सारी, संतोष गायकवाड आणि अजय पाटणे या १२ जणांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ सुरुवातीला वडीगोद्री येथे जाऊन हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर पुण्यात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या मंगेश ससाणेंची भेट घेणार आहे.

हे देखील वाचा : Nashik News : सिंहस्थ तयारीचा विभागनिहाय आढावा

दरम्यान, मुंबईत काल पार पडलेल्या बैठकीनंतर आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात जाऊन लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे.तसेच काल झालेल्या बैठकीत राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असे आश्वासन दिले आहे. याशिवाय सगेसोयरेंना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. त्याबाबत येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी हे सर्व दाखले आधार कार्डाशी जोडण्यात येतील. तसेच मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी जशी मंत्र्यांची समिती आहे तशीच समिती ओबीसी-भटक्या समाजासाठीही तयार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना दिली होती. तसेच आजच्या बैठकीत जे निर्णय झाले आहेत त्याची माहिती शनिवारी आपण वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाकेंना देणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते. यानंतर आज भुजबळ यांच्यासह सरकारचे शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या