Thursday, November 14, 2024
HomeनाशिकNashik : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार - केंंद्रीय गृहमंत्री अमित...

Nashik : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार – केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nasik

भारतीय जनता पार्टीने कार्यकर्त्यांच्या बळावरच अनेक निवडणुकीत आजवर यश मिळवले आहे. सध्याच्या विरोधकंच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाला तिलांंजली देण्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक जिंकावीच लागेल.त्यासाठी मतभेद दुर करा, मरगळ झटकुन कामाला लागा. बूथ पातळीवरच्या भक्कम संघटनेच्या आधारावर महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल. असा विश्वास आहेच. फक्त आपल्या नाराजीतुन विरोधकांना बळ मिळु देऊ नका. असे आवाहन केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केले.

नाशिक येथे आज विभागीय संघटनात्मक बैठकीत केंंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. भाजपा विधानसभा प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंंद्र यादव,राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसुल मंत्री राधाकृष्ण वखे पाटील, आदीवासी विकासमंंत्री डॉ विजयकुमार गावीत, भाजपा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, आ. सीमा हिरे, देवयनी फरांदे, राहुल ढिकले, दिली प बोरसे, माजी मंत्री जयकुमार रावल, प्रा. राम शिंदे,डॉ. भारती पवार, माजी खासदार हिना गावीत, सुजय विखे पाटील, , प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने, विजय चौधऱी, शहराध्यक्ष प्रशात जाधव, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सुनील बच्छाव, प्रदीप पेशकर,सुनील केदार आदी यावेळी उपस्थित होते.

गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणुका ह्या देशाच्या राजकारणात मोठा बदल घडविणार्‍या आहेत. भा ज. पा कार्यकर्त्यांसाठी देशहीत सर्वात महत्वाचे आहे. सांंस्कृतिक राष्ट्रवादाच्या जोरावर भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित, समृद्ध बनवण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांचे पाठबळ गरजेचे आहे. अन्य पक्षांपेक्षा भाजपा निश्चीत वेगळा पक्ष आहे.महाराष्टातील विधानसभा निवडणुक देशाला दिशा देणारी ठरणार आहे.कारण त्यावर केरळ, तामीळनाडु, पश्चीम बंंगांलच्या राजकारणावर भाजपाची भिस्त अवलंबुन आहे. त्यामुळे मतभेद कायमचे मिटवावेत. प्रत्येकाने तीन कुंटुुंंब जोडावे.

स्वयंंशिस्त पाळावी.न्युनगंंड बाळगु नये. असे आवाहन त्यांंनी केले.आपण तिसर्‍यांदा केंद्रात सत्तेवर आलो आहोत. साठ वर्षानंतर पहील्यांदाच नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंंतप्रधान झाले आहे. हे कायम लक्षात ठेवावे. सर्व सहकारी संस्थांच्या सभासद शेतकर्‍यांना भेटून मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती कार्यकर्त्यांनी द्यावी ,राज्यातील अडीच कोटी लाभार्थ्यार्ंंच्या संंपर्कात राहाव. असेही गृहमंत्री शाह यांनी नमूद केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचेही भाषण झाले.त्यानी यावेळच्या निवडणुकीत कांंद्याचा वांंदा होणार नाही. असे स्पष्ट केले. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वागत करत विजय चौधऱी यांनी कार्यक्रमाचे सुत्रंसंचालन केले. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रास्तावीक केले.

कोणी समजवाायला येणार नाही
निवडणुकी मध्ये उमेदवारी मिळली नाही तर नाराज न होता दिलेल्या महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वांनी ताकदीने काम करावे, नाराजांची समजुत काढण्यासाठी अथवा त्यांची मनधरणी करण्यासाठी कोणी येणार नाही. आपण स्वताच पक्षासाठी उभे राहुन काम करावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने कार्यकर्ता बनुन पक्षांच्या विजयसाठी काम करावे. असे आवाहन अमीत शाह यांनी केले.

राऊतांसाठी नाशकात इस्पितळ शोधा – विखे पाटील
येता जाता भाजपावर तोंडसुख घेणार्‍या शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्यावर आज महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तोडसुख घेतले. ते म्हणाले की, राऊतांचा मानसीक स्थिती पाहता त्यांच्यासाठी नाशिक मध्ये एखादे चांगले हॉस्पीटल असेल तर शोधुन मला दाखवा.असा टोला त्यांनी मारला. संजय राऊत यांना केवळ टिकाच करता येते.त्यातुन त्यांंची मानसीकता दिवसें दिवस खराब होत असल्याचे ते म्हणाले.

आदिवासी विरोधी भुमीका घेेणार नाही
सध्या राज्यात धनगर विरुध् आदीवासी संघर्ष सुरु आहे. त्या बाबत रावसाहेब दानवे म्हणाले की, राज्यातील आदिवासी बाधवांंबाबत भाजपा कधीही विरोधी भुमीका घेेणार नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाल सुध्दा आम्ही आरक्षण दिले होते. मात्र उध्दव ठाकरे यांच्या सरकारला ते टिकवीता आले नाही. सर्वेाच्च न्यायालयातच खंबीरपणे बाजु मांंडता आली नाही. त्यामुळे आरक्षण हातचे गेले. मात्र आम्ही मराठा समजाला स्वतंत्र आरक्षण मिळवुन देण्यासाठी बांधील आहोत. असे दानवे म्हणले.

कांद्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, अफगाणीस्थानचा कांदा जरी आयात केला असला तरी कांदा उत्पादकांवर अन्याय होणार नाही. याची दक्षता सरकारने घेतली आहे.

खडसे पिचड गिते गैरहजर
केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्या उपस्थीतीत झालेल्या या महत्वपुर्ण बैठकीस माजी मंत्री मधुकर पिचड, एकनाथ खडसे व स्थायी समीतीचे माजी सभापती गणेश गिते यांची अनुपस्थीती प्रकर्षाने जाणवली. त्याबाबत दानवे यांना छेडले असता ते म्हणाले की, काही कामा निमीत्त ते बाहेर असल्यानायेऊ शकले नसतील. मात्र ते नाराज नाही. खडसे यांचा प्रवेशच अजुन झालेला नसल्याने ते अपेक्षीतच नव्हते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या